1.
Jalna Districtजालना जिल्हाबाल विश्व

प्रत्येक विद्यार्थी देशभक्त फक्त त्याला त्याची जाणीव करून द्या;देशभक्तांच्या छायाचित्र प्रदर्शनातील सूर

जालना- शालेय अभ्यास आणि त्यामुळे वाढणारा ताण यामध्ये विद्यार्थी देशभक्ती विसरत आहे ,असा समज झाला आहे परंतु हे सत्य नाही. खरंतर प्रत्येक विद्यार्थी हा देशभक्त आहे फक्त त्याला त्याची जाणीव करून द्यावी लागेल. असे मत देशभक्त कोशकार चंद्रकांत शहासने यांनी व्यक्त केले आहे .भारतातील सुमारे 2000 देशभक्त आणि क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन सध्या जालन्यात सुरू आहे त्यासाठी ते जालन्यात आले आहेत.

भारतामध्ये बहुसंख्येने देशभक्त आणि क्रांतिकारक होऊन गेले. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या ना कोणत्यातरी देशभक्त आणि क्रांतिकारकाचा वंशज आहे. त्यामुळे तो देखील देशभक्तच आहे .फक्त आपले वंशज देशभक्त होते याचा विसर या विद्यार्थ्यांना पडला आहे . या प्रदर्शनाच्या माध्यमातून किमान आपल्या परिसरातील, आपल्या जवळचे नातेवाईक देशभक्त होते याची आठवण विद्यार्थ्यांना करून देण्याचा या चित्र दर्शनातून प्रयत्न आहे. त्यासाठी 956 दिवस हे अभियान राबविला जाणार आहे .”ओळख देशभक्तांची- शाळा तेथे क्रांती मंदिर” या उपक्रमांतर्गत 2000 क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन दिनांक 11 पासून जालन्यात सुरू झाले आहे. जुना जालना भागातील मुक्तेश्वर तलावाच्या काठावर असलेल्या मुक्तेश्वर सभागृहामध्ये दिनांक 15 पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असल्याची या प्रदर्शनाचे संयोजक चंद्रकांत शहासने यांनी दिली आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button