मराठा आरक्षण; लाठी चार्ज प्रकरणी दोन पोलीस अधिकारी निलंबित
जालना- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलन सुरू होते. दरम्यान दिनांक एक सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर लाठी हल्ला केल्याप्रकरणी अंबड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांनी लोकसेवकाच्या पदाचा गैरवापर करून गैर कृत्य केल्याचे महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील कलम तीन चा भंग केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत असल्याच्या कारणावरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मुकुंद आघाव हे वर्ग एकचे अधिकारी आहेत. त्यांना कायद्याचे ज्ञान असूनही त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. निलंबन काळामध्ये मुकुंद आघाव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्यालय या कार्यालयाशी सलग्न राहावे असेही आदेशित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव चेतन निकम यांनी हे आदेश आज दिनांक 12 सप्टेंबर सप्टेंबर रोजी काढले आहेत.
दरम्यान दुसऱ्या प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांनाही गैर कृत्य केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे. त्यासोबत त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे देखील शासनाने निर्देश दिले आहेत. निलंबनाच्या काळामध्ये राहुल खाडे यांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी सलग्न राहावे व पोलीस अधीक्षकांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असेही आदेशित करण्यात आले आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172