Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

कशाला म्हणतात सफलता आणि संतुष्टी?- रमेश परतानी यांचे व्याख्यान

जालना -सफलते शिवाय संतुष्ट होता येत नाही आणि संतुष्ट झाल्याशिवाय सफलता मिळत नाही. खरे तर हे दोन्ही शब्द परस्पर विरोधी आहेत. परंतु ते दोन्ही एकत्र आल्याशिवाय सफल झालो आहोत असं म्हणता येत नाही, आणि सफलता ही पैशावरून होत नाही .असे विचार हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय बाल मस्तिष्क विकास विशेषज्ञ तथा अध्यात्मिक प्रशिक्षक रमेश परतानी यांनी व्यक्त केले.

भारतरत्न श्री. एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्य प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशन जालन्याच्या वतीने रमेश परताणी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक संचालक नगर रचनाकार सुखदेव पवार, उद्योजक सुनील रायठा, रुपम स्टीलचे श्री. तिवारी, असोसिएशनचे अध्यक्ष संजय चौधरी, सचिव विनोद यादव, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश शर्मा यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना परतानी म्हणाले की, आपणाला जे पाहिजे ते आपण आत्मसात केले तर ती सफलता आहे आणि जे मिळवलं ते पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी इच्छा प्रगट होणे म्हणजे ती संतुष्टी आहे. सफलता आणि संतुष्टी हे दोन्ही शब्द भिन्न -भिन्न आहेत परंतु ते दोन्ही एकत्र आल्याशिवाय सफलता मिळत नाही. सफलता मिळवण्यासाठी ज्या क्षेत्रात आपल्याला सफलता मिळवायची आहे त्या क्षेत्रातील फक्त पस्तीस ज्ञान आवश्यक आहे. उर्वरित 65% ज्ञान हे आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कमवावे लागते. त्यामध्ये महत्त्वाच्या बाबी म्हणजे आपला आत्मविश्वास, आपली जबाबदारी ,विकासाचा दृष्टिकोन, सकारात्मकता, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले नियोजन, यापूर्वी आपण जे काम केलेलं आहे त्यापेक्षा आणखी चांगलं काम करण्याचा संकल्प आणि आपल्या अंगी असलेला उद्योजकता हा गुण इतरांसोबत कसा वापरायचा याचे कसब .वरील बाबींचा जर उपयोग केला तर माणूस सफल होऊन संतुष्टही होईल परंतु दोन्हीपैकी एक गोष्ट जरी उद्योजकाने आत्मसात केली तरी तो सफल झाला असं म्हणता येणार नाही. असेही ते म्हणाले यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.

याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केलेल्या मान्यवरांचा ही सत्कार करण्यात आला. त्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रवीण कुमार उखळीकर यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल. डॉ. अभिषेक शुक्ला आयुर्वेद मधील कॅन्सर तज्ञ ,कुमारी कांचन थोरवे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये विजेते पद मिळवून दिल्याबद्दल. कुमारी श्रुती तवरावाला टेक्स्टाईल आर्टिस्ट ज्यांनी देश-विदेशात भारतीय हस्तकलेला प्रसिद्धी दिली. विश्राम देशपांडे जालन्यातील वरिष्ठ अभियंता ज्यांनी अभियंता म्हणून जालन्यात पहिला पाय ठेवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता अजित छाबडा यांनी केले पाहुण्यांचा परिचय परिषदेचे अध्यक्ष संजय चौधरी आणि सचिव विनोद यादव यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभियंता पंकेश खुरुद यांनी केले.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button