Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

घटस्फोटीत पित्यानेच पळवले पोटच्या मुलीला; तीन तास थरार

जालना – अडीच वर्षांपूर्वी घटस्फोट झालेल्या दांपत्यापैकी पित्यानेच आपल्या साडेपाच वर्षाच्या मुलीला पळून नेत असतानाचा थरार दिनांक 18 रोजी जालन्यात दुपारी घडला. एक ते तीन वाजेच्या सुमारास सुरू असलेला हा प्रकार सुज्ञ नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच उघडकीस आला आहे आणि कदिम जालना पोलिसांनी अपहरण केलेली मुलगी सुखरूप ताब्यात घेतली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार दिप्ती उर्फ दिव्या गोविंद सिंग राजपूत वय 37 वर्ष यांचे अकोला नगर येथील होली क्रॉस शाळेसमोर राहत असलेल्या केडिया प्लांट मधील योगेश नरेंद्र परमार, यांच्यासोबत विवाह झाला. त्यांना साडेपाच वर्षाची प्रियल नावाची मुलगी देखील आहे .दरम्यान पारिवारिक अडचणींमुळे अडीच वर्षांपूर्वी दीप्ती आणि योगेश यांचा घटस्फोट झाला. न्यायालयाने या दोघांची मुलगी असलेल्या प्रियलचा ताबा मुलीच्या आईकडे दिला. मुलगी आणि आई सध्या कांचन नगर भागामध्ये राहत आहेत .हा ताबा देत असतानाच न्यायालयाने मुलीच्या वडिलांना दर शनिवारी दुपारी तीन ते पाच या वेळे दरम्यान कौटुंबिक न्यायालयामध्ये मुलीला भेटण्याची परवानगी दिली आहे. हे सुरळीत सुरू असताना सोमवार दिनांक 18 रोजी मुलीचे वडील योगेश नरेंद्र परमार हे आपल्या काही साथीदारांसह जालन्यात आले आणि दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रियल ही एका शाळेतून नेहमीप्रमाणे व्हॅन मधून  घरी आली.ती व्हॅन मधून उतरत असतानाच आरोपी योगेश नरेंद्र परमार याने आपल्या स्विफ्ट डिझायर कार मध्ये तिला बसवून पळून नेले. हा प्रकार परिसरातील नागरिकांनी पाहिला आणि मुलीच्या आईने देखील तातडीने या वाहनांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. हे करत असतानाच तीन वाहनांपैकी दोन वाहने इतर दिशेने निघून गेली, आणि एक वाहन कांचन नगर मुक्तेश्वर तलाव, पाठक मंगल कार्यालय मार्गे मोतीबाग इकडे जात असताना रेल्वे गेटमध्ये दुसऱ्या एका स्कुटी वरील महिलेला धडक दिली त्यामुळे या वाहनाची गती मंदावली ,त्याच वेळी या वाहनाच्या मागे मुलीचे नातेवाईक देखील पाठलाग करत होते. हा पाठलाग करत असताना पाठक मंगल कार्यालय समोर एक चार चाकी वाहन एमएच ४३ ए टी 29 87 या वाहनाला सुज्ञ नागरिकांनी अडवले .यामध्ये तीन तरुण होते. नागरिकांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये काहीच आढळून आले नाही. परंतु वाहन चालकाला सविस्तर माहिती देखील देता आली नाही. जालन्यात कशासाठी आला?  कुठे आला आहे ?कोणाकडे आला आहे? याचे काहीच उत्तर न दिल्याने नागरिकांचा हे अपहरण करते असल्याचा संशय बळावला .तेवढ्यात मुलीचे नातेवाईकांनी देखील यांनी मुलीला पळवले असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी या तरुणांना कदीम जालना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. दरम्यान या वाहनांमध्ये असलेल्या तीन तरुणांपैकी दोन तरुण खाली उतरले आणि तिसरा तरुण खाली उतरण्याच्या तयारीतच नव्हता. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये दीप्ती राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रियल चे वडील योगेश नरेंद्र परमार याच्यासह अन्य दोघांविरुद्ध याच्याविरुद्ध भादवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर नागरे यांनी आपल्या साथीदारांसह अकोला शहर गाठले आणि तिथे जाऊन तपास करून या मुलीला सुखरूप ताब्यात घेतले आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button