Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

सोने का पालना, सोबतच “चांदी का जालना” म्हणून होणार जालन्याची ओळख; अनोखा गणेश मंडळाचाअनोखा उपक्रम; 85 लाखांच्या 101 किलो चांदीच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा

जालना- ज्या गणेश मंडळाच्या नावातच “अनोखा” हा शब्द आहे त्या गणेश मंडळाचे उपक्रम देखील अनोखेच असतात. अनोखा गणेश मंडळाचे हे 8वे वर्ष आहे आणि या आठव्या वर्षी या मंडळाने तब्बल 85 लाखांच्या 101 किलो वजनाच्या चांदीच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जालना “सोने का पालना” अशी ओळख असलेल्या जालन्याची आता चांदीच्या गणपतीचा जालना अशी ओळख झाली तर नवल वाटायला नको.

गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणाकडूनही वर्गणी न घेता हा एवढा मोठा खर्च केला जात आहे. सुमारे पाच महिन्यांपूर्वी विदर्भातील खामगाव येथील विश्वकर्मा सिल्वर पॅलेस या प्रतिष्ठानला गणपती तयार करण्यासाठी सांगितले होते. पाच महिन्याच्या अथक परिश्रमानंतर आज हा भव्य दिव्य गणपती अनोखा गणेश मंडळांनी जालन्याच्या गणेश भक्तांसाठी उपलब्ध करून दिला. आहे हे मंडळ एवढ्यावरच न थांबता जानेवारीमध्ये प्रस्तावित असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भव्य दिव्य श्रीराम मंदिराचा देखावा देखील उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वांसाठी हा देखावा विनामूल्य उपलब्ध आहे. त्यासोबत दररोज सुमारे पाच हजार भाविकांना प्रसादाचेही मोफत वाटप केले जाणार आहे. त्यासोबत भाविकांना सेल्फी काढता यावी, मुलांना खेळणी खेळता यावी या उद्देशाने विविध खेळणी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आज छोटे खाली झालेल्या प्राणप्रतिष्ठा पूजना नंतर उद्यापासून सर्वांसाठी दर्शन उपलब्ध होणार आहे. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते आज विधिवत पूजा करून श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तत्पूर्वी अनोखा गणेश मंडळाचे मुख्य मार्गदर्शक स्वर्गीय किशोर अग्रवाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर या 101 किलो वजनाच्या गणपती विषयी या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जगदीश भारतीय यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. फक्त गणपतीचे वजन 101 किलो असून गणपतीच्या वरील छत्र आणि इतर साहित्य असे मिळून 107 किलो च्या जवळपास हे वजन होत आहे .भविष्यामध्ये ज्याप्रमाणे भव्य दिव्य गणपती आहे त्याचप्रमाणे भव्य दिव्य मंदिर उभारून जालनेकरांसाठीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी जालन्याची ओळख” चांदीच्या गणपतीच्या” नावाने व्हावी असा मानस असल्याचेही अनोखा गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जगदिश भरतीया यांनी व्यक्त केली. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ पाहू शकता.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button