35000 ची लाच; जाती प्रमाणपत्र समितीचा सहाय्यक लाचेच्या जाळ्यात
जालना-जात प्रमाणपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी वरिष्ठांच्या नावाने लाच मागणारा लाचखोर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचा कंत्राटी संशोधक सहाय्यक याला 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
जालना येथील जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे या प्रकरणातील तक्रारदाराच्या मुलांनी तेली जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने अर्जामध्ये त्रुटी आहेत, त्यामुळे प्रमाणपत्र देता येणार नाही असे सांगून त्या दूर करायच्या असतील तर वरिष्ठांना चाळीस हजार रुपयांची हजार रुपयांची लाच द्यावी लागेल .अशी मागणी या प्रकरणातील आरोपी राहुल शंकर बनसोडे वय 43 ,संशोधक सहाय्यक (कंत्राटी )जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती ,राहणार पंचशील नगर मोंढा नाका, छत्रपती संभाजी नगर याने केली.
तडजोडीअंती 35 हजार रुपयांवर हा व्यवहार ठरला. यासंदर्भात तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली आणि या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 22 सप्टेंबर रोजी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष या व्यवहाराची खात्री केली. व्यवहार ठरले असल्याचे खात्री झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिनांक 25 रोजी दुपारी 35 हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडून घेताना राहुल शंकर बनसोडे याला पंचा समक्ष पकडले आहे . त्याच्याकडून 35 हजार रुपयांची लाचही जप्त केली आहे याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
>edtv jalna news App on play store,
>web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
for News&advt- DilipPohnerkar
–9422219172