29 ता.ला बालकांची होणार मोफत हृदयरोग (2D Eco)तपासणी व उपचार

जालना- जिल्हा रुग्णालय जालना यांच्या वतीने विशेष मोहिमेअंतर्गत शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांच्या हृदयाची मोफत तपासणी आणि आजार आढळल्यास त्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या विशेष शिबिरासाठी मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या हृदयरोग तज्ञ डॉ. स्वाती दरेकर या स्वतः या तपासण्या करणार आहेत .यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी जास्तीत जास्त नावनोंदणी करावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रताप घोडके यांनी केले आहे. आत्तापर्यंत 60 रुग्णांची नोंदणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
ही आहेत लक्षणे बाळाच्या त्वचेचा, ओठाचा रंग निळसर पडणे,श्वास घेण्यास त्रास होणे,
बाळाला पळताना, खेळतांना धाप लागणे
छातीत दुखणे,धडधड वाढणे(ठोके वाढणे)
श्रमाची कामे करताना दम लागणे,वजन कमी होणे
वयोमनानुसार वजन न वाढणे.अधिक माहितीसाठी संपर्क, आणि नाव नोंदणीसाठी :9561621938,8007217661,9075590972,9833282815 जिल्हा रुग्णालय,जालना DEIC केंद्र, OPD क्रमांक :29 येथे सकाळी 09 ते 05 वाजेपर्यंत संपर्क करावा.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172