Jalna Districtजालना जिल्हा

मराठवाडा मुक्तिसंग्रामाची थरारक गाथा मंचावर साकार

जालना – स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ अशा असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या नेतृत्वात मराठवाड्यातील जनतेने लढलेल्या थरारक मुक्तिसंग्रामाची गाथा 25 सप्टेंबर रोजी जालना येथे जेईएस महाविद्यालयाच्या मंचावर साकार झाली.

मराठवाडा मुक्तीलढ्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या संस्कृतिक संचालनालयाच्या वतीने मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांतील सर्व 76 तालुक्यांमध्ये डॉ. सतीश साळुंके व ॲड. शैलेश गोजमगुंडे लिखित ‘गाथा मुक्तिसंग्रामाची’ या नाटकाचे प्रयोग सध्या होत आहेत.
भारत स्वतंत्र झाला तरी हैदराबादच्या निजामाने मराठवाड्यातील जनतेवर जुलमाने सत्ता चालवून भारतात विलीन होण्यास नकार दिला. त्यावर पेटून उठलेल्या सर्व जातिधर्माच्या लोकांनी निजामाशी केलेला संघर्ष आणि स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या बलिदानाची ही प्रेरणादायी गाथा सम्राट नाट्यसंस्था व सांस्कृतिक मंडळ धाराशिव या संस्थेच्या कलावंतांनी अतिशय उत्कट अभिनयातून सादर केली. निजामकाळ दर्शवणारे नेपथ्य, शाहिरी बाजाचे संगीत व प्रभावी प्रकाशयोजनेतून नाट्यपरिणाम अधिक गडद होतो. या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. सुधीर निकम यांचे आहे. व्यवस्थापन व नेपथ्य रामेश्वर झिंजुर्डे, संगीत हरीओम जैस्वाल, प्रकाशयोजना मुकेश ढवळे, रंगभूषा निकिता डोख, वेशभूषा आकाश अरगडे यांची आहे. यात अशोक चने, सुमित डोंगरदिवे, अभिलेख कुढेकर, सौरभ वाघ, रोहित सोनारकर, अविनाश राठोड, नामदेव जाधवर, अंजली वाहुळ, मृण्मयी देशमुख, प्राजक्ता कळमकर, दत्तात्रेय काकडे, ऋषिकेश आव्हाड, यश पाटील, अभिषेक उंबरकर, विशाल सरोदे, दुर्गेश सरनाईक, आदिनाथ कुबेर, शुभम चव्हाण यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button