कुठे आणि कोणावर असणार आहे पोलिसांची नजर? पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

जालना-जालना – गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .उद्या दिनांक 28 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून विसर्जनाच्या ठिकाणी हा बंदोबस्त तयार राहील. तसेच शेवटच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत हा बंदोबस्त तिथे कायम राहणार आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने जयत तयारी केलेली आहे .त्यामध्ये 53 सीसीटीव्ही कॅमेरे ,एक अद्यावत ड्रोन कॅमेरा, त्याचप्रमाणे पोलीस बलामध्ये एक पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक, सहा पोलीस उपाधीक्षक, 20 पोलीस निरीक्षक ,49 पोलीस उपनिरीक्षक, तसेच एकूण 1300 पोलीस अंमलदार, 492 होमगार्ड व एक राज्य राखीव पोलीस बलाची कंपनी, नऊ ट्रायकिंग फोर्स असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या ठिकाणी राहणार विशेष लक्ष
जालना जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांमध्ये मोबाईल वर ठेवलेल्या स्टेटस वरून 33 गुन्हे दाखल झाले आहेत. या स्टेटस मुळे विविध समाजाची मने दुखावल्या गेली आहेत. त्यामुळे अशा स्टेटस ठेवलेल्या भागात तसेच जाफराबाद ,भोकरदन ,मंठा आणि परतुर या ठिकाणी पोलिसांचे विशेष लक्ष राहणार राहणार असल्याचेही श्री बलकवडे यांनी सांगितले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store