1.
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

गणेश विसर्जन स्थळाच्या पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले तब्येतीचे रहस्य

जालना- आज सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरू आहे .जालन्यात घरगुती गणेशांचे विसर्जन हे मोती तलावात करण्यात येतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून या तलावाच्या काठावरच पूर्वीची नगरपालिका आणि आजची महानगरपालिका यांच्या वतीने दोन कृत्रिम हौद निर्मित करण्यात आले आहेत.त्यासोबत यावर्षी निर्माल्य साठवण्यासाठी दोन कुंभही स्थापित करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात घरगुती गणपती हे मोती तलावात विसर्जित न करता या कृत्रिम हौदामध्ये विसर्जित केला जात आहेत. तलावाच्या दुसऱ्या बाजूला सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. या या दोन्ही विसर्जन स्थळांची  जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी दुपारी बारा वाजेच्या सुमारास  पाहणी केली. यावेळी जालना शहर महानगरपालिका आणि सामान्य रुग्णालय यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिरही इथे भरवण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्हाधिकारीश्री. पांचाळ यांनी स्वतःचा रक्तदाब आणि मधुमेह तपासला असतात दोन्ही तपासण्या या सामान्य निघाल्या आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्हा तणावाच्या वातावरण असताना देखील त्यांच्या या तपासण्या सामान्य निघाल्याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटलं . त्यांच्या या आश्चर्याला EDTV NEWS माध्यमातून त्यांच्या तब्येतीचे रहस्यही उलगडून दिले आहे.

गणेश विसर्जन स्थळाच्या पाहणीसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांसह महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन मोरे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांच्यासह महानगरपालिकेचे कर्मचारी ठाण मांडून आहेत.

https://whatsapp.com/chnnel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
for News&advt- DilipPohnerkar
9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button