साने गुरुजींच्या विचारांची शिदोरी जपण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड!
जालना – वंदनीय साने गुरुजी शतकोत्तर जयंती वर्ष निमित्ताने शहरातील हरिओमनगरातील सदाव्रते परिवाराने ‘ गुरुजींची साधना ‘ देखाव्यातून अनोखा विषय साकारला आहे. साने गुरुजींचे जन्मस्थान,पंढरपूर मंदीर अन्नत्याग उपोषण यासह ‘ श्यामची आई ‘ या ग्रंथातील विविध आशयांच्या ‘ चित्रकथा’ आधारित देखावा मांडण्यात आला आहे, हे विशेष.गुरुजींची साधना !अध्यापन कार्य, समाजसेवा, स्वातंत्र्ययुध्द अशा बहुविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘साने गुरुजी ! ‘मातृभूमीच्या सेवेसाठी नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्यसमरात त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सुखासाठी झटत राहिले. समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी, एकता निर्माण व्हावी, शेतकरी-कामकरी वर्गाचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे व सर्वत्र समाजवादाची स्थापना व्हावी या हेतूने ते सर्वत्र जनजागृती करत राहिले. लहान मुले, स्त्रिया, तरुण, दीन-दलित यांना स्वत्त्वाची जाणीव व्हावी व उत्तमोत्तम विचारांची देणगी मिळावी यासाठी अत्यंत संस्कारक्षम असे साहित्य त्यांनी निर्माण केले.
आज साने गुरुजींसारखे उदात्त व्यक्तिमत्त्व आपल्यामध्ये नसले तरीही त्यांचा हा साहित्यरूपी अनमोल ठेवा आपल्याकडे आहे. अत्यंत सोप्या भाषेतील या बोधप्रद कथा, वैचारिक लेख, इतर भाषांमधील महान लेखकांचे अनुवादित साहित्याने विचारांची दिशा बदलत आहे. प्रत्येक घर गुरुजींच्या विचारांनी पावन व्हावे, हीच एकमेव इच्छा !
यासाठीच आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. देखाव्याची संकल्पना सुहास सदाव्रते यांची असून सुयोग सदाव्रते, सायली सदाव्रते यांनी सजावट व मांडणी केली आहे.
=======
यंदाचे वर्ष हे वंदनीय साने गुरुजी यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आहे..
गुरुजींचे विचार आजच्या डिजिटल जमान्यातील युवापिढीला कळावे,या हेतूने आम्ही यंदा ‘साने गुरुजींच्या सुसंस्कार विचारधारेवर आधारित देखावा तयार केला आहे.वंदनीय साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आणि हेलस साने गुरुजी कथामाला शाखेची तीन दशकाची वाटचाल यानिमित्त ‘ गुरुजींची साधना !’ या संकल्पनेवर आधारित
विशेष देखावा तयार करण्यात आला आहे’श्यामची आई’ या ग्रंथातील बेचाळीस कथा आहेत. या कथावर आधारित ‘ चित्रकथा’ देखाव्यात मांडण्यात आल्या आहेत. यात सावित्री व्रत,अक्काचे लग्न,मुकी फुले,
पुण्यात्मा यशवंत,मथुरी, थोर अश्रू, पत्रावळ,
क्षमेविषयी प्रार्थना, मोरी गाय,पर्णकुटी, भूतदया,
श्यामचे पोहणे, स्वाभिमान रक्षण, श्रीखंडाच्या वड्या
रघुपती राघव राजाराम,तीर्थयात्रार्थ पलायन, स्वावलंबनाची शिकवण,अळणी भाजी,पुनर्जन्म, सात्त्विक प्रेमाची भूक,दूर्वांची आजी, आनंदाची दिवाळी,अर्धनारी नटेश्वर, सोमवती अवस, देवाला सारी प्रिय बंधुप्रेमाची शिकवण, उदार पितृहृदय, सांब सदाशिव, पाऊस , मोठा होण्यासाठी चोरी, तू वयाने मोठी नाहीस.. मनाने, लाडघरचे तामस्तीर्थ, कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक, गरिबांचे मनोरथ, वित्तहानीची हेटाळणी,आईचे चिंतामय जीवन, तेल आहे तर मीठ नाही!,अब्रूचे धिंडवडे, आईचा शेवटचा आजार, सारी प्रेमाने नांदा’ अशा चित्र कथांचा देखावा मांडण्यात आला आहे.
• साधना’ साप्ताहिकाचा पहिला अंक,साने गुरुजींनी सुरु केलेल्या ‘ साधना ‘ साप्ताहिकात पहिल्या अंकात जी संपादकीय भूमिका गुरुजींनी मांडली आणि अग्रलेखात विचार मांडले त्या पहिल्या अंकातील साने गुरुजींचे निवेदन लेख मांडण्यात आला आहे.
• पंढरपूर मंदीर उपोषण,बहुजनांच्या पंढरपूर मंदीर प्रवेशासाठी अन्नत्याग उपोषण केले होते. उपोषणाचा संदर्भ मांडणारे छायाचित्र आहे.• साने गुरुजींचे साहित्य देखाव्यात साने गुरुजींनी लिहिलेले ‘श्यामची आई, ‘मंदिर प्रवेशाची भाषणे, सुंदर पत्रे, गोड शेवट, गोड निबंध, सती,कर्तव्याची हाक, स्त्री जीवन, भारतीय संस्कृती, चिंतनिका, आस्तिक, स्वप्न, श्यामची पत्रे, धडपडणारी मुले,सोनसाखळी व इतर कथा,पत्री, भगवान श्रीकृष्ण, पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी, मेंग चियांग व इतर कथा, इस्लामी संस्कृती, विश्राम आणि श्रमणारी लक्ष्मी अशी पुस्तके मांडण्यात आली आहे.• गुरुजींची साधना !’ या देखाव्यात आचार्य विनोबा भावे,यदुनाथ थत्ते, प्रकाशभाई मोहाडीकर, राम शेवाळकर ,दत्तात्रय हेलसकर यांचे छायाचित्र लक्ष वेधून घेते.
https://whatsapp.com/chnnel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
for News&advt- DilipPohnerkar
–9422219172