Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

विजेचा धक्का लागून 14 वर्षीय बालिकेचा मृत्यू

जालना -शहरातील अंबड रस्त्यावर असलेल्या सिद्धार्थ नगर मध्ये राहणाऱ्या राजनंदिनी सुरेश पंडित या 14 वर्षीय बालिकेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे.

शुक्रवार दिनांक 29 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास सिद्धार्थ नगर भागात असलेल्या विजेच्या खांबामध्ये वीज प्रवाह उतरला आणि त्याजवळ उभ्या असलेल्या राजनंदिनी सुरेश पंडित या चौदा वर्षीय बालिकेचा या खांबाला हात लागला आणि तिला झटका बसला .अशा अवस्थेमध्ये नातेवाईकांनी तिला सामान्य रुग्णालयात भरती केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान राजनंदिनीला वडील नाहीत, भाऊ नाही आणि तिच्यापेक्षा लहान  तीन बहिणी आहेत. त्यामुळे या सर्व कुटुंबाची जबाबदारी याच भागात राहणारे तिचे काका सांभाळत होते.

https://whatsapp.com/chnnel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
for News&advt- DilipPohnerkar
9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button