प्रेरणा जेष्ठ नागरिक संघाकडून गुणवंताचा सत्कार
जालना -जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात कारण तेथील माणसांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. तिथे सेवानिवृत्ती नाही, याचे कारण म्हणजे त्यांच्यामधील सकारात्मकता हे आहे . त्याच पद्धतीची सकारात्मकता ऊर्जा आपल्याला प्रेरणा जेष्ठ नागरिक संघामध्ये पाहायला मिळाली .असे मत प्राध्यापक वंदना शेवाळे यांनी व्यक्त केले.
प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि मान्यवरांच्या सत्काराचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सौ. मीना ढोबळे माजी नगरसेविका उषा पवार, मीना टेकाळे आणि सौ. शीला देशमुख यांची उपस्थिती होती. हा सर्व कार्यक्रम महिलांच्या वतीनेच आयोजित केला गेला.
पुढे बोलताना वंदना शेवाळे म्हणाले की, माणूस वयाने जरी वृद्ध झाला तरी ज्ञानाने तो वृद्ध होत नाही. त्याचमुळे कदाचित जापान मधील माणसे 100 वर्षाच्या पुढे जगतात, कामात निरंतर राहतात, त्यामुळे ते निरोगी आणि दीर्घायुषी होतात आणि कायम काम करत राहतात. दुसऱ्याला प्रेरणा देत राहतात तशीच प्रेरणा या प्रेरणा जेष्ठ नागरिक संघाकडून मिळत आहे.कार्यक्रमाला प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघाचे बाळकृष्ण पाठक, बाबूलाल राऊत, मनोहर देशपांडे, अशोक जाधव, संजय पवार, अशोकराव खंडाळे, संजय जगताप, आदींची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/chnnel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
for News&advt- DilipPohnerkar
–9422219172