आईसाहेब जिजाऊ जयंती निमित्त उद्या सर्व शाळांना सुट्टी
जालना- उद्या दिनांक 12 जानेवारी म्हणजेच आईसाहेब जिजाऊ यांचा जन्मदिवस .जालना जिल्ह्याच्या बाजूलाच असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या सिंदखेडराजा येथे त्यांचा जन्म झाला आणि हे ठिकाण जालन्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर आहे . त्यामुळे जालन्यातून अनेक जण माझी जाऊन च्या दर्शनासाठी मातृत्व सिंदखेड राजा येथे जातात.
जिजाऊंच्या दर्शनाचा सर्वांनाच लाभ घेता यावा त्यासाठी जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने उद्या दिनांक 12 जानेवारी रोजी सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, स्वयं अर्थसाह्य, जिल्हा परिषद, केंद्रीय प्राथमिक शाळा, कस्तुरबा गांधी विद्यालय अशा सर्व शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. दरम्यान शिक्षणाचा अधिकाराचे उल्लंघन होऊ नये या हेतूने शाळेचे 230 दिवस कामकाज होईल या हेतूने सुट्ट्यांचे नियोजन करावे असे आवाहनही शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशात केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172