उद्घाटन करायला आले आणि दुचाकी चोराला धरून नेले; तुमची आहे का यामध्ये?
जालना- अर्थपुरवठा करणाऱ्या एका वित्तीय संस्थेच्या उद्घाटनासाठी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन गेले होते .यावेळी ढोल वाजवणाऱ्या एका विधी संघर्ष बालकावर अल्पवयीन मुलावर )त्यांची नजर पडली आणि क्षणार्धात त्याला कुठेतरी पाहिल्याची घंटा त्यांच्या डोक्यात वाजली. डोक्याला ताण दिला असता महिनाभरापूर्वी वाहन चोरीच्या प्रकरणात तो संशयित म्हणून असल्याचा फोटो पाहिल्याचे लक्षात आले. श्री. महाजन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून या बालकाला विश्वासात घेऊन चौकशी करण्यास सांगितले आणि या बालकाकडे निघाले घबाड.
पोलिसांचा विश्वासात घेऊन हा शब्द भारी आहे. त्यांच्या “विश्वास” शब्दाचा अर्थ होतो “पोलिसीखाक्या”. या बालकाला विश्वासात घेतल्यानंतर त्याने सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील रिलायन्स मॉल समोरील गणेश ऑटो गॅरेज या दुकानासमोरून एक एक्टिवा स्कुटी चोरली असल्याचे सांगितले. त्यावरून अधिक माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेतले. त्यावेळी त्याने ही स्कुटी मोती तलाव जालना येथे पेट्रोल संपल्यामुळे रस्त्यावर सोडून दिल्याचे सांगितले. या एक्टिवा चा शोध घेतला असता ती कदीम जालना पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्याचे समजले. हळूहळू सर्व माहिती विचारली असता त्याच्याकडे एकूण पाच स्कुटी आणि तीन मोटरसायकल असा एकूण तीन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल सदर बाजार पोलिसांनी जप्त केला आहे .
जप्त केलेल्या दुचाकी वाहनांच्या किल्ल्या उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या हस्ते संबंधितांना खात्री करून देण्यात आल्या .ज्या वाहनांवर क्रमांक नाही असे वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत माहिती घेऊन संबंधितांना कळविल्या जात आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन ,विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, पोलीस कर्मचारी धनाजी कावळे, सुभाष पवार, रामेश्वर जाधव, देवाशीष वर्मा, अजीम शेख, भरत ढाकणे, गजानन डोईफोडे, अनिल काकडे, प्रदीप करतारे हे या तपास कामाचे शिलेदार आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172