संगीता लाहोटी खून खटला: न्यायालयात आज काय झालं?
जालना- योगशिक्षिका संगीता लाहोटी यांचा दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास खून झाला होता .या खुनाचा आरोप त्यांच्या घरी नोकर असलेल्या भीमराव धांडे यांच्यावर आहे. घटनास्थळीच भीमराव धांडे यांनी विष पिऊन आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केला होता. या खटल्याची सुनावणी दहा जुलै 2022 पासून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांच्यासमोर सुरू आहे.
आतापर्यंत संगीता लाहोटी यांच्या घरी काम करणारे कामगार ,त्यांचे नातेवाईक आणि प्रत्यक्षदर्शीच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. आज दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या त्यामध्ये पोलीस निरीक्षक यु. व्ही. चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल यांच्या साक्षी नोंदविला .सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली तर बचाव पक्षाच्या वतीने विधीज्ञ अनिरुद्ध घुले यांनी बाजू मांडली .या खटल्यातील आता दोन साक्षीदार तपासण्याचे बाकी आहेत. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक जारवाल आणि या खून खटल्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांच्या साक्षी नोंदविला जाणार आहेत. 22 फेब्रुवारी 2024 रोजी या साक्षी नोंदविला जाणार आहेत. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयात होईल सुमारे मार्च एप्रिलमध्ये या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172