मंदिरात अश्लील चाळे करणाऱ्यांना 15 हजार रुपयांच्या दंड ;मौनीबाबांची लेखी साक्ष न्यायालयात ग्राह्य
जालना -मंदिरामध्ये भर दुपारी नग्नावस्थेत अश्लील चाळे करणाऱ्या एका जोडीला न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एक साक्षीदार फितूर झाला असला तरी मौनी बाबांनी न्यायालयात मौन न सोडता लेखी साक्ष दिली आणि ती साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरून तीन आरोपींपैकी दोन आरोपींना वरील दंड ठोठावला आहे.
जालना तालुक्यातील हिवरा रोशन गाव शिवारात असलेल्या विठ्ठल माळ परिसरात विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये दिनांक 11 ऑगस्ट 2014 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हिवरा रोशनगाव येथे राहणाऱ्या सुनील सारंग थोरात आणि लक्ष्मी नगर मंठा रोड येथे राहणाऱ्या एका एका पैठणे नावाच्या महिलेसोबत अश्लील चाळे सुरू केले होते .हे चाळे करत असताना बाजूलाच गाई चारत असलेल्या रमेशसिंग छगनसिंग जमादार (मौनगिरी महाराज) यांनी पाहिले आणि त्यांना त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितले .परंतु ही जोडी तेथून निघण्याच्या मनस्थितीत नव्हती .शेवटी दोघांमध्ये वाद झाला आणि ती जोडी मोटरसायकलवर निघून गेली. दुपारी मंदिरातून काढून दिलाचा राग मनात धरून रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपी सुनील सारंग थोरात याने महाराज राहत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील कुटीला व गाय बांधलेले असलेल्या गोठ्याला आग लावून दिली. यामध्ये कुटी मधील ज्वारी, गव्हाचे पोते, जनावरांचा कडबा जळून नष्ट झाला. मौनगिरी बाबांचे मौन असल्यामुळे त्यांनी त्यांचा एक सहकारी ज्ञानेश्वर नानाभाऊ निळकंठ यांच्या हस्ते मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये अश्लील चाळे केल्याचा गुन्हा नोंदविला.
या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एम. एन. घोडे यांच्याकडे आला आणि त्यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात तीन साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये रमेशसिंग छगनसिंग जमादार उर्फ मौनगिरी महाराज, तपासी अमलदार एम. एन. घोडे आणि ज्ञानेश्वर निळखन यांचा समावेश आहे यापैकी ज्ञानेश्वर निळकंठ हे फितूर झाले. अशा परिस्थितीमध्ये मौनगिरी बाबांनी न्यायालयामध्ये मौन न सोडता लेखी साक्ष दिली. ही साक्ष ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती बी. एम .गारे यांनी आरोपी सारंग थोरात आणि श्रीमती पैठणे या दोघांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे तर या प्रकरणातील तिसरा आरोपी नामदेव शंकर शिंदे राहणार बापकळ, याची पुराव्या अभावी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियंता बी.बी. जाधव यांनी काम पाहिले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172