फ्लॉप शो महासंस्कृती महोत्सवाचा; नेत्यांच्या नातेवाईकांपुढे जिल्हा प्रशासन झुकले स्थानिक कलाकार ,रसिक चांगल्या कार्यक्रमाला मुकले;

जालना- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य व संचालनालय मुंबई, जिल्हा प्रशासन जालना यांच्या समन्वयातून दिनांक 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजन जालना येथील जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन होण्यापूर्वीच प्रेक्षकांना अभावी खुर्च्या उचलण्याची जिल्हा प्रशासनाने ओढवली आहे.
या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन एका नेत्याच्या नातेवाईकाला देण्यात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील आपली जबाबदारी झटकत या नातेवाईकाच्या सांगण्यानुसार ठिकाण, कार्यक्रम ठरवले आहेत, विशेष म्हणजे या सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश बाजूला ठेवून स्थानिक कलाकार, रसिक, प्रेक्षक, व्यावसायिक यांचा कसलाच विचार न करता बाहेरून आलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन काम करत असल्यामुळे पहिल्याच दिवशी या सांस्कृतिक महोत्सवाचा फ्लॉप शो झाला आहे . जालना शहरात मध्यवस्तीत पोलीस कवायत मैदान, जिल्हा क्रीडा संकुल, स्वर्गीय कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल हे असताना शहराबाहेरील नातेवाईकांच्या सांगण्यामुळे निवडलेले जेईएस महाविद्यालय हे ठिकाण सर्वांसाठीच गैरसोयीचे ठरले आहे. त्यातच स्थानिक कलाकारांना, व्यावसायिकांना, मान्यवरांना विश्वासात न घेता कार्यक्रमाचे नियोजन करणे हे देखील अंगलट आले आहे. खरंतर 12 तारखेच्या पूर्वसंध्येला निघालेली शोभायात्रेच्या वेळीच या महोत्सवाची “शोभा” होणार होती, परंतु शालेय विद्यार्थ्यांमुळे ती टळली. पहिल्याच दिवशी सहा वाजता होणारे उद्घाटन प्रेक्षकांअभावी सव्वा आठ वाजता उरकते घ्यावे लागले. आणि रिकाम्या खुर्च्यांसमोर कलाकारांना टाळ्यांची दाद मागावी लागली. उद्घाटनानंतर प्रसिद्ध नृत्यांगना सोनाली कुलकर्णी यांनी देखील रिकाम्या खुर्च्यांपुढेच आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करून घेतले. तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांनी या सर्व प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती मात्र त्याचा कुठलाही विचार न करता जिल्हा प्रशासनाने नेत्यांच्या नातेवाईकांनी ठरवून दिलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसारच हा कार्यक्रम घेतल्यामुळे हा फ्लॉप शो झाल्याचे बोलले जात आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172