राजुरी स्टीलच्या मॅनेजरचे 27 लाख लुटणारी टोळी जेरबंद; जालन्याच्या तिघांचा समावेश
जालना- लोखंडी सळ्यांचे उत्पादन करणाऱ्या राजुरी स्टील कंपनीच्या मॅनेजरला लुटणारी टोळी येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली आहे आणि पाच जणांना अटक ही केले आहे. त्यापैकी तिघेजण हे जालन्यातील स्थानिक रहिवाशी आहेत.
राजुरी स्टीलचे व्यवस्थापक रामेश्वर शिवप्रसाद श्रीमाळी वय 46 राहणार मोदीखाना हे दिनांक 14 फेब्रुवारी रोजी कंपनीने विक्री केलेल्या स्टीलची रोख रक्कम 27 लाख घेऊन येत असताना बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या धोत्रा पाटीजवळ वळण रस्त्यावर श्रीमाळी यांच्या वाहनाला अडवले. सात आठ जणांनी त्यांच्या गाडीला घेरले त्यापैकी काही जणांनी श्रीमाळी यांची गाडी थांबतात चार-पाच जणांनी श्रीमाळी यांना बांधून घाटामध्ये नेऊन टाकले .काही आरोपींनी रोख रक्कम पळवून नेली. याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता .बुलढाणा आणि जालना दोन्ही ठिकाणचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.
दरम्यान काही अनोळखी इसम जालना शहरातील छत्रपती संभाजी नगर रोडवर फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली .त्यानुसार आज दिनांक 20 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हा शाखेच्या एका पथकाने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या रस्त्यावरील एका पांढऱ्या रंगाच्या हुंडाई कंपनीमध्ये बसलेल्या काही तरुणांना हटकले ,परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमधून सहा लक्ष रुपये रोकड मिळाली आहे. अधिक चौकशी केली असता कचरू किसन पडूळ वय 35 वर्ष राहणार मंमादेवी नगर नूतन वसाहत जालना, बहादूर सखु प्रसाद पासवान वय 40 वर्षे राहणार चंदोली उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम राजुरी स्टील कंपनी जालना. विष्णू गोविंद बनकर वय 38 राहणार दरेगाव जिल्हा जालना ,दारासिंग बाबू सिंग राजपूत वय 46 राहणार मोरंडी मोहल्ला जालना. आणि पाचवा सुनील शिवाजी धोत्रे व तीस वर्षे राहणार मदनेश्वर नगर नेवासा जिल्हा अहमदनगर. अशी नावे सांगितली. गाडीची कागदपत्रे आणि रोख रकमेबाबत चौकशी केल्यानंतर बुलढाणा येथे अंधेरा पोलीस ठाणे अंतर्गत राजुरी स्टीलची वसुली घेऊन येणाऱ्या मॅनेजरला लुटले असल्याची कबुली यांनी दिली आहे .या लुटमार मध्ये सुमारे 15 जणांचा समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान या लुटमारी संदर्भात वाहन कुठे? कसे जाते? कधी येणार? आहे किती वसुली आहे? ही सर्व माहिती कंपनीच्या मालकांना अंधारात ठेवून नोकराने या टोळीला पुरविली असल्याचेही समोर आले आहे. आज स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172