आपल्याला खाण्याकरता नाही तर खाऊ घालण्याकरिता जगायचे आहे- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
जालना -भारत म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे त्यामुळे आपल्याला खाण्याकरता नाही तर खाऊ घालण्याकरिता जगायचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ह. भ. प. डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांच्यावर लिहिलेल्या “अवघ्या साधनांचे सार आनंद निधान” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यासोबत डॉ. आनंदगडकर महाराज यांचे, समता -ममता आणि समरसता या त्रिसूत्री काम सुरू आहे त्यामुळे त्यांच्यासोबत राहून आपले आणि देशाचे जीवन उद्धरित होते असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. यावेळी व्यासपीठावर ह भ प भगवान बाबा आनंदगडकर आणि पत्रकार रमेश पतंगे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना सत्संगचालक डॉ. भागवत म्हणाले” आपल्या देशात संत आहेत आणि यापुढेही ते असतील, परंतु इतर देशांमध्ये ते होऊन गेले आहेत. आता असतीलच असे नाही आणि जरी असले तरी त्यांच्याकडे कोणी पाहत नाही . भारतातील आपण सर्वजण एकच आहोत परंतु काही काळा पुरते वेगवेगळे आहोत. संत निरंतर या अवस्थेत असतात कारण ते एका ठिकाणी एका देहात बसलेले असले तरी ते जगातल्या प्रत्येक सुखदुःखाशी आणि अनंताशी जुळलेले असतात. म्हणून पूर्ण श्रद्धेने त्यांचे अनुकरण करणे त्यातच आपले हित आहे “.असेही ते म्हणाले केवळ नारे देऊन उपयोग नाही तर प्रत्यक्ष कृती आणि श्रद्धा ठेवली तरच कामे होतात आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामावर आपली श्रद्धा होती त्याचे फलित म्हणून श्रीराम मंदिर उभे राहिले असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एड. रघुनंदन निकरट यांनी केले. सूत्रसंचालन डॉ जयश्री किनारीवाल यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनोज कोलते यांनी मानले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172