1.
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

नो एन्ट्री !आ.बबनराव लोणीकर यांना टकले पोखरी येथून जावे लागले परत

मंठा -परतूर -मंठा विधानसभा मतदारसंघाचे  भाजप चे आ. बबनराव लोणीकर यांना मंठा तालुक्यातील टकले पोखरी येथील ग्रामस्थांनी गावामध्ये एन्ट्रीच दिली नाही.

निवडणुकीच्या तोंडावर विविध विकास कामांचा सपाटा सध्या सुरू झाला आहे .आज सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच पर्यंत वेगवेगळ्या गावातील दहा ठिकाणी या विकास कामांचे उद्घाटन आमदार लोणीकर यांच्या हस्ते होणार होते .दरम्यान दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मंठा तालुक्यातील टकले पोखरी येथे आमदार लोणीकर आणि त्यांचे कार्यकर्ते पोहोचले परंतु गावकऱ्यांनी गावाबाहेरच त्यांना थांबविले. गावात प्रवेशच करू दिला नाही .आमदार लोणीकर यांच्या कार्यकर्त्याने गावकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला. याच वेळी या संभाषणाचे चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणाला देखील या कार्यकर्त्याने चित्रीकरण करण्यास मज्जाव केला तरी देखील तरुणाने हे लाईव्ह चालू आहे असे मनात चित्रीकरण केलेच. गावकऱ्यांपुढे कार्यकर्त्याचे काहीच न चालल्यामुळे शेवटी लोणीकर यांना आपल्या कार्यकर्त्यासह टकले पोखरी येथून पाय काढता घ्यावा लागला.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button