लक्ष ठेवा-शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरीता 448 पदांची निर्मिती; लवकरच जाहिरातही निघणार
जालना- जालना येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरीता आवश्यक एकूण 448 पदांच्या निर्मितीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या दि. 6 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये या पद निर्मितीसाठी मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र शासन व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून जालना येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 रुग्णखांटाचे रुग्णालय स्थापन करण्यास मंत्रीमंडळाच्या दि. 28 जून 2023 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या दि. 14 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरीता गट-अ ते गट-ड मध्ये एकूण 448 पदांची निर्मिती करण्यास व भरण्यास तसेच त्यापोटी येणाऱ्या रुपये 34.70 कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी गट-अ ते गट-क मधील नियमित 185 पदे व विद्यार्थी पदे 59 त्याचप्रमाणे बाह्यस्त्रोताव्दारे घ्यावयाच्या 204 मनुष्यबळ सेवा अशी एकूण 448 पदे चार टप्प्यात निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
पदनिर्मितीचे विवरण पुढील प्रमाणे आहे. विवरणपत्र ‘अ’ नुसार गट-अ – अधिष्ठाता पदसंख्या-1, प्राध्यापक पदसंख्या-20, सहयोगी प्राध्यापक पदसंख्या-26, मुख्य प्रशासकीय अधिकारी पदसंख्या-1, गट-ब – सहायक प्राध्यापक पदसंख्या-40, सांख्यिकी-नि-अधिव्याख्याता पदसंख्या-1, प्रशासकीय अधिकारी पदसंख्या-1, लघुलेखक (उच्चश्रेणी) पदसंख्या-2, गट-क- ग्रंथपाल पदसंख्या-1, कार्यालयीन अधीक्षक पदसंख्या-2, सहायक ग्रंथपाल पदसंख्या-2, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) पदसंख्या-5, रोखपाल पदसंख्या-1, वरिष्ठ सहायक पदसंख्या-15, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदसंख्या-10, इ.सी.जी. तंत्रज्ञ पदसंख्या-4, क्ष-किरण तंत्रज्ञ पदसंख्या-10, लघुलेखक (निम्नश्रेणी) पदसंख्या-3, प्रक्षेपक पदसंख्या-1, ग्रंथसुचिकार पदसंख्या-1, वरिष्ठ लिपिक पदसंख्या-13, कनिष्ठ लिपिक पदसंख्या-22, ग्रंथपाल सहायक पदसंख्या-3, विद्यार्थी पदेमध्ये वरिष्ठ निवासी (सेवा) पदसंख्या-59.
विवरणपत्र ‘ब’ (बाह्यस्त्रोताने) नुसार छायाचित्रकार पदसंख्या-2, कलाकार पदसंख्या-2, सहायक ग्रंथपाल पदसंख्या-4, सांकेतिक लिपिक पदसंख्या-4, कनिष्ठ लिपिक पदसंख्या-26, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदसंख्या-11, इ.सी.जी. तंत्रज्ञ पदसंख्या-11, क्ष-किरण तंत्रज्ञ पदसंख्या-11, प्रयोगशाळा सहायक पदसंख्या-26, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) पदसंख्या-5, सूतार पदसंख्या-1, प्लंबर पदसंख्या-1, आरोग्य अनुशासक पदसंख्या-3, आरोग्य उपनिरिक्षक पदसंख्या-5, लघुलेखक (निम्नश्रेणी) पदसंख्या-17, लघुटंकलेखक पदसंख्या-6, वाहनचालक पदसंख्या-4, सुरक्षारक्षक पदसंख्या-16, दप्तरी पदसंख्या-4, शिपाई पदसंख्या-8, हमाल पदसंख्या-1, सफाईगार पदसंख्या-36.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172