त्यांना लगाम घाला- ब्राह्मण समाज आक्रमक
जालना- ब्राह्मण समाजातील नेत्यांना आणि ब्राह्मण समाजावर खोटे आरोप करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्याला लगाम घालण्यात यावा अशी मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
ब्राह्मण समाजाला संरक्षण देण्यासाठी संरक्षण कायदा तयार करण्यात यावा.ब्राह्मण समाजावर राजकीय लाभाकरिता आरोप करून जातीजातीत तेढ निर्माण करणाऱ्या व चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींविरूध्द कडक कारवाई करण्यात यावी. आणि यापुढे असे ते निर्माण करणाऱ्याला लगाम घालण्यात यावा ,तसेच ब्राह्मण एक्य परिषदेचे आयोजक बाजीराव धर्माधिकारी व त्यांचे सहकारी यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे
यासाठी आज समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी रवींद्र देशपांडे, सिद्धिविनायक मुळे, शुभांगीताई देशपांडे, रसना देहेडकर, अरुणा फुलमामडीकर, दीपाली बिन्नीवाले, संगीताताई देशपांडे, सुनंदा बदनापुरकर,विद्याताई कुलकर्णी, सरिता जहागीरदार,अनंत वाघमारे, गिरीश दशरथ, अमित कुलकर्णी,ऐड. प्रवीण मुळे, ऐड. शरद कुलकर्णी, ऐड. श्रीधर वाघृळकर, ऐड. विनोद कुलकर्णी, सिद्धू पिंपरकर, शार्दूल भाले, शशिकांत दाभाडकर, अभय शिवणगिरीकर, सुमित कुलकर्णी, दीपक रणनवरे, प्रसाद पाटील, तेजस कोळेश्वर, रमेश देहेडकर,श्रीकांत शेलगांवकर, रमेश फुलमामडीकर, यशवंत बदनापुरकर, भगवान पुराणिक, सतीश अकोलकर, सचिन पाटील, मधुसूदन दंडारे, संतोष दाणी, गोविंद पाचपोर, पी.जी. देशपांडे, नरेंद्र जोशी, विश्वम्भर पाटील, मुकुंद महाजन, गणेश जोशी, डी.एस. मावकर, के.बी. पुराणिक, संजय देशपांडे, आदींची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172