विकास कामांच्या भूमिपूजनापासून आ.गोरंट्याल यांना ठेवले वंचित, काय म्हणाले ते…
जालना- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज सुमारे 101कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते त्यामुळे निविदा कशा निघाल्या? कधी निघाल्या? कोणत्या दैनिकात जाहिराती आल्या? आणि काम कोणाला मिळाले? हे आता जालन्यातील जनतेला सांगण्याचे काम राहिले नाही, कारण हे कामच भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या विकास निधीचे आहे. त्यामुळे वेगळे काही सांगायची गरज नाही.
दरम्यान या शुभारंभासाठी असलेले बॅनर आणि जाहिरात बाजी मध्ये जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांचे कुठेही नाव दिसले नाही, एकेकाळी मांडीला मांडी लावून नगरपालिकेमध्ये सत्ता असताना विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी सौ. संगीता गोरंट्याल या नगराध्यक्ष होत्या आणि शहरातील रस्त्यांची कामे करण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र लागत होते. त्यामुळे प्रत्येक कामाच्या उद्घाटनाला आणि लोकार्पणाच्या वेळी आमदार कैलास गोरंट्याल यांची उपस्थिती आवर्जून असायची. परंतु आता महापालिकेमध्ये प्रशासक आहे त्यामुळे आयुक्तांची गरजच नाही. परंतु आज एवढ्या मोठ्या कामाच्या भूमिपूजनात पत्रिकेमध्ये आमदार गोरंट्याल यांचे सुद्धा दिसले नाही, याउलट मागच्या लोकसभेमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटणारे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव विशेष अतिथी मध्ये होते. आणि ते उपस्थितही होते.
हा कार्यक्रम जरी भारतीय जनता पक्षाचा आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आणलेल्या निधीतून भूमिपूजनाचा असला तरी जालना शहराचे नव्हे तर जालना तालुक्याचे आमदार म्हणून आमदार कैलास गोरंट्याल यांना निमंत्रण असणे अपेक्षित होते. परंतु हा कार्यक्रम भाजपाचा आहे असे सांगितले गेले .जर तसे असेल तर पत्रिकेतील इतर नेत्यांची असलेली नावे ,हे नेते कोणत्या पक्षाचे आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भूमिपूजनाच्या समारंभापासून वंचित ठेवल्याबद्दल आमदार गोरंट्याल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172