मराठा आरक्षणासाठी तरुणाची प्रवरासंगम नदी मध्ये उडी घेऊन आत्महत्या

नेवासा -जालना तालुक्यात असलेल्या देवगाव खवणे या गावातील 21 वर्षीय तरुणाने नेवासा ता. नेवासा जि. अहमदनगर जवळ असलेल्या प्रवरासंगम नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक 13 रोजी उघडकीस आली आहे. आपण आत्महत्या करत असल्याची माहिती त्याने त्याच्या आईला व्हाट्सअप वरून दिली होती.
जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यात असलेल्या देवगाव खवणे येथील मोहन मोरे हे दोन मुले आणि पत्नीसह कामानिमित्त छत्रपती संभाजी नगर जवळ असलेल्या वाळूज मधील बजाज नगर मध्ये राहत होते. त्यांना दोन मुले होते त्यापैकी ओम हा मोठा होता .दरम्यान ओम याने दिनांक 12 तारखेला त्याच्या आईला व्हाट्सअप वरून मेसेज केला आणि मराठा आरक्षणासाठी आपण जीवन संपवत असल्याचे सांगितले. त्यानंतर आईने देखील बराच वेळ कॉल करण्याचा प्रयत्न केला मात्र तो उचलला गेला नाही. दिनांक 13 रोजी नेवासा पोलिस यासंदर्भात तपास करत असताना प्रवरासंगम नदीमध्ये तरुणाचा मृतदेह सापडला. उत्तरीय तपासणी केल्यानंतर उडी मारून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे .दरम्यान याप्रकरणी नेवासा फाटा पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. तरुणावर त्याच्या मूळ गावी देवगाव खवणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172