गुंतवणूक परिषदेतून हाती लागली 6हजार रोजगारांच्या निर्मितीची खाण
जालना -जिल्हा उद्योग केंद्राने नुकतीच जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित केली होती .या परिषदेतून जालना जिल्ह्यासाठी सहा हजार रोजगार निर्मितीची खाण हाती लागले आहे. ही खाण हाती लागण्यासाठी सुमारे 35 गुंतवणूकदारांनी 1300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे, आणि त्या अनुषंगाने जिल्हा उद्योग केंद्र म्हणजेच महाराष्ट्र शासन आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये सामंजस्य करारही झाले आहेत. या करारासंदर्भातील प्रमाणपत्र देखील याच गुंतवणूक परिषदेत उद्योजकांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
जालना जिल्ह्यामध्ये वाढत असलेले औद्योगीकरण, त्यामध्ये औद्योगिक वसाहतीचा नवीन टप्पा, समृद्धी महामार्ग, रेल्वेची पीट लाईन, ड्रायपोर्ट आणि आता नव्यानेच येऊ घातलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आयोजित केलेली गुंतवणूक परिषद देखील रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाची खाण ठरली आहे. विशेष वेद स्टील प्रायव्हेट लिमिटेड औद्योगिक वसाहती मधील तिसऱ्या टप्प्यात या कंपनीचे काम प्रगतीपथावर आहे .मार्च 2025 मध्ये कंपनी मधून सळ्याचे उत्पादन बाहेर पडेल असा संकल्प करण्यात आला आहे. कंपनीने अडीचशे कोटींच्या गुंतवणुकीच्या बदल्यात 3000 रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन या गुंतवणूक परिषदेमध्ये दिले आहे. खरं तर जालना शहरांमध्ये सध्या देखील 200 कोटी 400 कोटी 500 कोटी अशी गुंतवणूक असलेल्या अनेक कंपन्या आहेत त्या चांगल्या स्थिरावल्या आहेत .परंतु एक नवीन कंपनी येत आहे आणि त्यांनी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देखील कंपनीने जाहीर केले आहे . त्यामुळे या कंपनीचा विशेष उल्लेख केला गेला.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ, उद्योजक सुनीलभाई रायठ्ठा, भारतीय रसायन संस्था (ICT )चे संचालक प्रो.डॉ.उदय अन्नपूर्णे, उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते ,जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अजिंक्य अजगेकर ,यांच्यासह उद्योग क्षेत्रातील इंडस्ट्रीज असोसिएशनचे नरेंद्र अग्रवाल, लघुउद्योग भारतीचे किशोर देविदास, ओम साई राम स्टीलचे दिनेश, भारुका, राजेंद्र भारुका, कालिका स्टीलचे गोविंद गोयल वेद स्टीलचे डॉ. रितेश अग्रवाल आदी उद्योजकांची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172