नाव्हा संस्थांनच्या दुर्लक्षामुळे गोशाळेतील दोन वासरांचा मृत्यू- भाविकाचा आरोप; जनावरे अशक्त असल्यामुळे मृत्यू संस्थांनचे स्पष्टीकरण
जालना- तालुक्यातील नाव्हा येथे असलेल्या श्री. रंगनाथ महाराज संस्थान यांच्या वतीने गोशाळा चालवल्या जाते. दरम्यान या गोशाळातील एका वासराला जंगली पशु ने फाडल्यामुळे आज त्याचा मृत्यू झाला तर अपेक्षेपेक्षा जास्त गाईंना एके ठिकाणी कोंडल्यामुळे यामधील एका गाईच्या वासराचा पोटातच मृत्यू झाला असल्याचा आरोप रंगनाथ महाराजांचे भक्त नकुल उगले यांनी केला आहे. दरम्यान जनावरे अशक्त असल्यामुळे हे मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण संस्थांनच्या वतीने देण्यात आले आहे.
श्री रंगनाथ महाराज संस्थान नाव्हा यांच्या नावाने सुमारे 500 एकर विविध ठिकाणी शेत जमीन आहे. संस्थानला उत्पन्नही भरपूर आहे. संस्थांनच्या वतीने गोशाळा देखील चालवल्या जाते .दरम्यान या गोशाळेतील जनावरांची देखभाल दुरुस्ती आणि त्यांना योग्य पद्धतीने चारा मिळत नसल्यामुळे ही जनावरे कुपोषित झाले आहेत. एका पत्र्याच्या शेडमध्ये या जनावरांना कोंडल्या जाते. त्यासाठी त्यांना कुठलीही चारा टाकण्याची व्यवस्था नाही. तसेच संध्याकाळी पाच नंतर ना इथे लाईट असतो ना कोणताही रखवालदार. शिवा ही गोशाळा मुख्य रस्त्यापासून आत मध्ये तीन किलोमीटर आहे तिथे दुचाकी शिवाय दुसरे वाहन जाणे देखील कठीण आहे.तसेच या जनावरांच्या देखभालिसाठी सायंकाळी पाच ते सकाळी 10 वाजेपर्यंत कोणीच नसते. या जनावरांसोबत काय होते? याची कोणालाही खबर मिळत नाही? म्हणूनच आज एका जंगली पशूने झाडाखाली बांधलेल्या दोन वासरांपैकी एका वासराचा चावा घेऊन त्याला ठार मारले आहे, तर दुसऱ्या गाईला पहिल्यांदाच वासरू होणार होते .परंतु जनावरांच्या लाथाळीमुळे या गायीच्या पोटातच हे वासरू दगावल्याची भीती व्यक्त केल्या गेली. त्यामुळे गाईच्या हालचालीवरून हे वासरू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला .त्यावेळी ते दगावल्याचे समोर आले . या दोन्ही घटना संस्थांनच्या वतीने दुर्लक्ष केल्यामुळे झाल्याचा आरोप भाविक नकुल उगले यांनी केला आहे.
दरम्यान या आरोपांचे खंडन करताना संस्थांनचे उपाध्यक्ष अरुण इंगोले यांनी ही जनावरे आजारी होती, अशक्त होती त्यामुळेच हा प्रकार घडलेला आहे .अनेक शेतकरी बांधव गाई अशक्त झाल्यानंतर त्या भाकड झाल्यानंतर इथे आणून सोडतात, त्यामुळे त्या नेहमीच आजारी असतात .अशा गाईंना देखील आम्ही योग्य पद्धतीने चाऱ्याची व्यवस्था करतो .पुढील महिनाभरामध्ये या जनावरांमध्ये लाथाळी होऊ नये म्हणून वासरे, गाई, गोऱ्हे यांचे वर्गीकरण करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बांधल्या जाईल यासाठी काम सुरू असल्याचेही श्री इंगोले यांनी सांगितले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172