चला शस्त्र जमा करा! जिल्हाधिकाऱ्यांनी काढला एकतर्फी आदेश

जालना – निवडणूक हा विषय अतिशय संवेदनशील असतो. त्यामुळे शासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अधिकारात देखील वाढ होते आणि म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या आदेशानुसार ज्यांच्याकडे शस्त्र आहेत त्यांचे म्हणणे ऐकून न घेता, निवडणुकीचा काळ असल्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शस्त्र जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्याचे आदेश सोमवार दिनांक 18 रोजी जारी केले आहेत. सन 1973 च्या फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144 अन्वये हे आदेश काढण्यात आले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, प्रत्येक शस्त्र परवानाधारकास नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्य परिस्थितीत शक्य नसल्याने, एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून असे आदेश पारित करीत आहे. शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकाऱ्यांनी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी/ कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी/ कर्मचारी तसेच सराफा यांचे व्यतिरिक्त माननीय उच्च न्यायालयातील जुन्या रिट पिटीशन 2009 / 2014 च्या आदेशास अधीन राहून इतर सर्व परवानाधारक व्यक्तींनी परवाना दिलेले शस्त्रास्त्र वाहून नेण्यावर व बाळगण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात येत आहे. शस्त्र परवानाधारकांनी आपले शस्त्र नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावेत. निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर एक आठवड्याचे आत संबंधितांचे शस्त्र परत करण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172