आचारसंहितेचा बागुलबुवा! घरांवरील ध्वजासंदर्भात अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम

जालना- लोकसभेचे पडघम वाजायला लागले आहेत आणि जिल्हा प्रशासन देखील कामाला लागले आहे. यातूनच आचारसंहितेचा बागुलबुवा देखील पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे संदर्भात आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक घरांवर वेगवेगळ्या रंगाचे, आणि वेगवेगळ्या मजकूर लिहिलेले ध्वज दिसत आहेत. हे ध्वज काढण्यासाठी शासकीय आणि निमशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे .परंतु असे ध्वज काढल्यामुळे अनेकांच्या भावना दुखायलाही सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी विरोध ही होत आहे . आचारसंहितेमध्ये यासंदर्भात नेमक्या काय सूचना आहेत, त्याचाच संभ्रम अधिकाऱ्यांमध्ये असल्याचे आज दिसून आले. जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांनी आज पत्रकार परिषदेत घरांवरील वेगवेगळ्या रंगाच्या ध्वजासंदर्भात तशा सूचना नाहीत परंतु निवडणूक आयोगाकडून या संदर्भात मार्गदर्शन मागू अशी माहिती दिली.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे शासकीय मालमत्तेवरील राजकीय पक्षांचे बॅनर्स, झेंडे आणि तत्सम प्रचार बाजी करणारे साहित्य हे 24 तासाच्या आत मध्ये काढून घ्यावे लागते, हाच नियम सार्वजनिक ठिकाणी 48 तासासाठी लागू होतो आणि वैयक्तिक मालमत्ते संदर्भात 72 तास देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आत्तापर्यंत 24 तासात शासकीय मालमत्तेवरील पाच हजार चौदा, सार्वजनिक ठिकाणचे 48 तासांमध्ये 4670 आणि वैयक्तिक म्हणजेच 72 तासांमध्ये 3488 अशा एकूण 13172 जाहिरात बाजी करणारे पोस्टर आणि बॅनर्स काढून घेण्याचे किंवा त्याच्यावर आवरण टाकण्याचे काम करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी पोलीस अधीक्षक अजय बंसल ,निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. हदगल यांची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172