“गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेला अंबड तालुक्यात शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

जालना- “आम के आम, गुठली के दाम” असा हिंदी मध्ये एक मुहावरा आहे. त्याच पद्धतीने मृद व जलसंधारण विभागाचे सध्या काम सुरू आहे. ते म्हणजे धरणांमधील गाळ काढणे आणि शेतात नेऊन नेऊन टाकणे.धरणांमधील गाळ काढल्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढते आणि हाच गाळ शेतामध्ये टाकल्यामुळे पिकाचे उत्पादन वाढते. अशाप्रकारे दोन्ही कडूनही आपलाच फायदा होतो. अशी ही योजना सध्या अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहे आणि याला शेतकऱ्यांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने हे काम केले जात आहे .अंबड तालुक्यातील वलखेडा पाझर तलाव, चिंचखेड पाझर तलाव, चिंचखेड साठवण तलाव, डावरगाव पाझर तलाव, नांदी पाझर तलाव ,आणि निहालसिंगवाडी पाझर तलाव या सहा गावांचे काम ज्योती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पाचोड यांना देण्यात आले आहे. सध्या निहालसिंग वाडी आणि चिंचखेडा पाझर तलाव येथे गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे .शासनाच्या वतीने गाळ उपसा करून ट्रॅक्टर मध्ये टाकून देण्याची जबाबदारी ही संबंधित यंत्रणेची आहे, तर हा गाळ वाहतूक करून आपल्या शेतात नेऊन टाकण्याची जबाबदारी ही शेतकऱ्यांची आहे. वर्षानुवर्ष तलावात वाहून आलेली माती म्हणजेच गाळ हा सुपीक असतो आणि शेतीला देखील त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्यामुळे शेतकरी स्वखर्चाने या गाळाची मोठ्या प्रमाणात वाहतूक करत आहेत .एक ट्रॅक्टर गाळ जवळपासच्या शेतामध्ये अडीचशे रुपयांमध्ये नेऊन टाकल्या जात आहे. या गाळामुळे शेतीचे उत्पादन वाढवून जमीन कसदार होते पाणी साठवण्याची क्षमता जास्त टिकून राहते आणि रासायनिक खतांचा वापर करण्याची गरज पडत नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
16 मार्चला ही गाळ काढण्याची मोहीम सुरू झाली यावेळी ज्योती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव लहू गायकवाड, सरपंच नंदकुमार पैठणे, मंडल अधिकारी कृष्णा एडके, तलाठी प्रांजली तायडे, यांच्यासह रामभाऊ मगरे, सुयोग सोळुंके, कृष्णा तागड, सुभाष वनारसे, आदींची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172