केवळ दीड हजार रुपयांसाठी “टॉप टू बॉटम” तिघेजण लाचेच्या जाळ्यात
जालना – वेगवेगळे उद्योग सुरू करण्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास निगम योजनेअंतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने कर्ज वाटप केले जाते .हे कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी या कार्यालयातील “टॉप टू बॉटम” अशा तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराचा सिंधूकृपा फूड्स नावाने मसाले उद्योग ग सुरू करण्याचा प्रस्ताव होता .हा प्रस्ताव महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्याकडे ऑनलाईन सादर केला होता .त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यासाठी तक्रारदाराने जालना येथील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कार्यालयात संपर्क केला. पहिल्या संपर्कात दि.28 एप्रिल ला तक्रारदाराची या कार्यालयात असलेल्या कार्यालय सहाय्यक छाया अशोक वाकोडे वय 54 वर्ष राहणार राजर्षी शाहू नगर अंबड रोड जालना ,(वर्ग तीन) यांची भेट झाली. त्यांनी प्रकरण मंजूर करण्यासाठी दीड हजार रुपये मागितले यावेळी पंच देखील समोर उभा होता .त्यानंतर श्रीमती वाकोडे यांनी त्यांचे वरिष्ठ सुनील लक्ष्मण काची वय 50 वर्ष ,जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यालय हिंगोली आणि अतिरिक्त पदभार जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यालय, जालना. राहणार सुवर्ण पार्क, पिंपळे गुरव, पुणे( वर्ग दोन) याच्याकडे पाठवले. त्याने छाया वाकोडे यांना पाचशे रुपये द्या असे म्हणून लाच देण्यास प्रवृत्त केले .दिनांक 28 एप्रिल ते 2 एप्रिल दरम्यान हा सर्व प्रकार चालू होता .तक्रारदार पुन्हा छाया वाकोडे यांच्याकडे आला आणि छाया वाकोडे यांनी दीड हजार रुपयांची लाच याच कार्यालयात असलेल्या बाह्यसेवा लिपिक आशिष उत्तमराव जाधव वय 24 राहणार पाचआंबा देवी जवळ नूतन वसाहत, या कंत्राटी कर्मचाऱ्याकडे देण्यास सांगितले .ही लाच देत असतानाच आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि आशिष जाधव याला लाच घेताना रंगेहात पकडले. त्यासोबत छाया वाकोडे आणि सुनील काची यांनी लाच देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांनाही ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पुढील तपास करत आहेत. विशेष म्हणजे याच प्रकरणातील वर्ग दोन चा अधिकारी सुनील काची याच्यावर 2018 मध्ये पुणे येथे पाचशे रुपयांची लाच घेताना देखील गुन्हा दाखल आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172