लोकसभेच्या रणांगणात मामांची एन्ट्री; म्हणाले “मी चांगला मामा”
जालना- जालना लोकसभा मतदारसंघाचे दुसरे अधिकृत उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे .तत्पूर्वी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाकर देवमन बकले उर्फ मामा यांना जालना लोकसभेच्या रणांगणात उतरविण्यात आले आहे त्यामुळे दादा नंतर आता मामांची या रणांगणामध्ये एन्ट्री झाली आहे.
18 एप्रिल पासून जालना लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, परंतु अद्याप पर्यंत या दोन पक्षांच्या उमेदवारा व्यतिरिक्त कोणीही आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही. दरम्यान धनगर समाजाचे असलेले प्रभाकर बकले यांनी आपल्या सोबत पूर्ण धनगर समाज आहे, आणि कोणीही आपल्या विरोधात धनगर समाजाचा प्रतिनिधी उभा करणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. घराणेशाहीतला कंटाळलेली जनता आपल्याला मत देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मामा म्हटल्यावर लोकांना कंस मामा आणि शकुनी मामा आठवतात, या प्रश्नाला प्रभाकर बकले यांनी मिश्किल पणे बगल दिली आणि म्हणाले “तो” मामा मी नाही मी “चांगला” मामा आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172