Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

गजानन तौर खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अमृतसर मधून अटक; आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी; पोलिसांचा दहा हजार कि.मी. चा प्रवास, दोन वाळू माफिया तडीपार

जालना- जालना जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात गाजलेल्या गजानन तौर या तरुणाच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी विलास देविदास पवार, याला पंजाब राज्यातील अमृतसर येथून जालना पोलिसांनी काल दिनांक तीन रोजी ताब्यात घेतले.आज जालन्यात आणल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक आठ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .दरम्यान या आरोपीला पकडण्यासाठी मागील पंधरा दिवसांपासून पोलिसांचे पथक विविध राज्यांमध्ये फिरत होते .आरोपी वारंवार ठिकाण बदलत असल्यामुळे सुमारे दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

विविध ठिकाणी गुन्हे दाखल असलेल्या गजानन तौर या तरुणाची दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी जालना शहरात मंठा चौफुलीवर भर दिवसा दुपारी दोन वाजता गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींपैकी भागवत विष्णू डोंगरे, लक्ष्मण किसन गोरे, रोहित नरेंद्र ताटीपामुलवार या तिघांना यापूर्वीच पोलिसांनी अटकही केलेली आहे. गजानन तौर, याच्या हत्ये प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी विलास पवार हा कर्नाटक येथे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक कर्नाटक राज्यातील बिदर येथे गेले. पोलीस जाईपर्यंत आरोपी फरार झाला होता. त्यानंतर तो राजस्थान व पंजाब येथे असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तिथेही याचा तपास केला परंतु तो वारंवार ठिकाण बदलत असल्यामुळे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. शेवटी विलास पवार हा ज्या विश्वासू माणसांच्या संपर्कात होता त्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपी अमृतसरलात असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या मदतीने या आरोपीला पकडले. आरोपी वारंवार नाव आणि ठिकाण बदलून राहत होता. दरम्यान या आरोपीवर आत्तापर्यंत नऊ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये जालना तालुक्यात जालना आणि  आणि शेवली, जालना जिल्ह्यातील घनसावंगी, पंजाब अमृतसर मध्ये एक  नांदेड जिल्ह्यात पाच असे एकूण नऊ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आजच्या या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी ,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांची उपस्थिती होती. दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक के .ए. वनवे ,विलास आटोळे ,शमुवेल कांबळे, सचिन चौधरी, लक्ष्मण शिंदे ,चंद्रकांत माळी, रामेश्वर कुऱ्हाडे, सागर बाविस्कर ,आदींचा समावेश होता. दरम्यान याच वेळी भोकरदन तालुक्यातील हसनाबाद आणि राजुर येथील दोन वाळू माफी यांना तडीपार केल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button