Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

बनावट कीटकनाशके पकडली जालनाच्या दुकानात; गुन्हा दाखल केला नांदेडच्या दुकानदारावर

जालना- दिल्ली येथील टू बडी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गेल्या 16 वर्षांपासून फिल्ड मॅनेजर असलेल्या राहुल पुरुषोत्तम झोमन, वय 33 वर्ष. यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात जालन्यातील एका दुकानात बनावट औषधी पकडल्या प्रकरणी तक्रार दिली, परंतु पोलिसांसमक्ष पकडलेल्या या बनावट औषधी प्रकरणी या दुकानावर गुन्हा न दाखल करता ज्यांनी माल विकला आहे त्या नांदेडच्या दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अजब प्रकार काल दिनांक पाच रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मामा चौकात घडला.

सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत राहुल सोमन यांनी म्हटले आहे की ,”फिल्ड ऑफिसर असल्यामुळे भारतात कुठेही बनावट औषधी तपासण्याचे काम करतो .दिनांक 4 एप्रिल रोजी मी व माझे कंपनीचे असोसिएट्स सतीश तानाजी पिसाळ असे दोघे खाजगी वाहनाने जालन्यात आलो. जालना येथे बनावट औषधी बाबत माहिती घेतली असता मला व तानाजी पिसाळ यांना जालना बस स्टँड जवळील महेश मंगलचंद अग्रवाल यांचे आनंद ऍग्रो एजन्सी बी बियाणे या दुकानात बनावट औषधीची व पॅकेजिंग ची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. यावरून आम्ही सविस्तर तक्रार अर्ज तयार करून सतीश पिसाळ यांनी पोलीस स्टेशन सदर बाजार जालना येथे जाऊन दिला. त्यानंतर काही वेळाने मामा चौकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने हे त्यांचे सहकारी आणि दोन पंच आले. मिळालेल्या माहितीनुसार श्री. माने यांच्यासोबत आनंद ऍग्रो एजन्सी बी- बियाणे या दुकानावर दुपारी तीन वाजेच्या सुमारास छापा मारला. दुकानाच्या काउंटर वर एक इसम हजर मिळून आला, त्याला श्री .माने यांनी पंचा समक्ष त्यांचे नाव गाव पत्ता विचारला असतात त्यांनी आपले नाव महेश मंगलचंद अग्रवाल, वय 50 वर्ष राहणार अजिंठा नगर असे सांगून आनंद ऍग्रो एजन्सी  बी- बियाण्याच्या दुकानाचा मालक असल्याचे सांगितले. त्यानंतर श्री माने यांनी त्यांच्या दुकानातील isabion 1ltr ×10 sangeeta कंपनीचा एक बॉक्स खुला व सहा बॉक्स पॅकिंग असलेले ज्यामध्ये एकूण 68 बॉटल प्रत्येकी बॉटल एक लिटरची किंमत 1050 रुपये  एकूण 71 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या माला संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने शहानिशा केल्यानंतर हा  माल बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पंचा समक्ष दुकानाचे मालक श्री. अग्रवाल यांना विचारणा केली असता त्यांनी हा माल नांदेड येथील वेंकटेश्वर अग्रो एजन्सी एसबीआय चौक,  नवीन मोंढा नांदेड येथून खरेदी केल्याचे सांगितले. आणि या खरेदीचे जीएसटीचे बिलही दाखवले.ज्यावर Gstin -27AATPA5308G1ZR  हा क्रमांक आहे.

दरम्यान या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी राहुल झोमन यांच्या तक्रारीवरून नांदेड येथील वेंकटेश्वर ऍग्रो एजन्सीच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे माल जालन्यातील दुकानात सापडला असताना नांदेडच्या दुकानावर गुन्हा कसा ? अशी चर्चा कीटकनाशके व बी बियाणे विक्रेत्यांमध्ये सुरू आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button