Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

त्याच पुढे काय? बनावट औषधी प्रकरण; आरोपीच ठोकणार”त्या तिघांवर” अब्रू नुकसानीचा दावा

जालना – शेतीला लागणारे सिंजेंटा कंपनीचे बनावट औषधी सापडल्या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 4 एप्रिल रोजी कंपनीचे अधिकारी राहुल पुरुषोत्तम झोमन यांनी गुन्हा दाखल केला होता. जालन्यातील बस स्थानकाजवळ असलेल्या आनंद ऍग्रो एजन्सी मध्ये हे बनावट औषध सापडले होते. आणि याप्रकरणी नांदेड येथील वेंकटेश्वरा ऍग्रो एजन्सीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आनंद ऍग्रो एजन्सीच्या च्या दुकानात हा माल सापडल्यानंतर पुरवठा धारकावर गुन्हा कसा? असा प्रश्न उपस्थित केला गेला आणि ईडी टीव्ही ने यासंदर्भात बातमी प्रकाशित केली . दुपारी तीन ते संध्याकाळी नऊ दरम्यान म्हणजेच सहा तासात यामध्ये बराच घडामोडी घडल्या, आणि याची भनक सुद्धा आरोपीला लागली नाही. म्हणूनच आज वेंकटेश्वरा ऍग्रो एजन्सी चे मालक आणि या प्रकरणातील आरोपी सचिन कासलीवाल यांनी हात झटकले आहेत. मी उत्पादक नाही मी फक्त पुरवठाधारक आहे .त्यामुळे एका पुरवठा धारकाकडून मी माल घेतो आणि दुसऱ्या दुकानदाराला विकतो, एवढेच माझे काम आहे. त्यासाठी लागणारा परवाना माझ्याकडे आहे .असे असताना ज्या दुकानात हा बनावट माल सापडला त्या दुकानदाराला आरोपी करण्याचे सोडून ,मला कोणतीही विचारणा न करता आरोपी केलेच कसे ?असे म्हणत गुन्हा दाखल करणारा पोलीस अधिकारी, ,दुकानदार ,आणि या कंपनीच्या अधिकारी, या तिघांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात ठोकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुढे बोलताना सचिन कासलीवाल म्हणाले की, यासंदर्भात त्यांच्या वकिलांनी जालनाचे पोलीस अधीक्षक अजय बंसल यांची भेट घेतली आणि हे सर्व प्रकरण त्यांना सविस्तर सांगितले .यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस ,उपनिरीक्षक यांचीही उपस्थिती होती. त्यावेळी या प्रकरणासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केल्या गेले मात्र अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button