कर नका भरू, मलाच द्या पैसे !जालना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा लाचखोरीचा फंडा
जालना- जालना महानगरपालिकेमध्ये नागरिकांच्या कर वसुलीसाठी काम मिळावे यासाठी अनेक जण सरसावलेले असतात आणि त्या अनुषंगाने नाना तर्हेने हे कर वसुलीचे ते काम मिळवतात मग हे काम चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला देखील मिळते फक्त त्याची सर्व तयारी असावी आणि यातूनच गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला महानगरपालिकेमधील कर वसुलीमध्ये आधा तुम्हारा आधा हमारा हा फंडा एका प्रकरणामुळे उघडकीस आला आहे महानगरपालिकेचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी उत्तम शंकरराव लढाने वय 54 वर्ष राहणार म्हाडा इन्कम टॅक्स कॉलनी पदभार वसुली लिपिक वर्ग चार याला 30 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
जालना महानगरपालिकेत कोणाकडे कोणता पदभार दिल्या जाईल हे काही सांगता येत नाही. जिथे कमाई चे पद आहे अशा ठिकाणी वर्णी लावण्यासाठी सर्व उपाय केले जातात .अशाच या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याची वसुली लिपिक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मार्च महिना असल्यामुळे नागरिकांकडे वसुलीचे तगादेही सुरू झाले. त्या अनुषंगाने जालना शहरातील एका नागरिकाकडे एक लाख 24 हजार 596 रुपये एवढा कर बाकी होता. त्या कराची नोटीस बजावण्यासाठी उत्तम लडाणे हे गेले होते.या नोटीसीच्या उत्तरा दाखल तक्रारदाराने दिनांक पाच एप्रिल रोजी 41 हजार 532 रुपयांचा धनादेश दिला. उर्वरित 83 हजार रुपयांच्या रकमेसंदर्भात उत्तम लडाणे यांनी ही रक्कम भरू नका, मला ४०हजार रुपये द्या, मी बेबाकी प्रमाणपत्र देतो. असे सांगितल्यामुळे तक्रारदाराने देखील दहा हजार रुपये रोख देऊन टाकले. त्यानंतर उरलेल्या 30हजार रुपयासाठी तक्रारदाराकडे तगादा सुरू झाला. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या अधिकाऱ्यांनी बुधवार दिनांक 10 रोजी सापळा रचला .या सापळ्यामध्ये आरोपी उत्तम शंकरराव लाडाने वय 54 वर्ष याला जालना महानगरपालिकेपासून जवळच असलेल्या गांधीचवन भागातील एका औषधी दुकानावर तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. दरम्यान उत्तम लडाने याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवार दिनांक 12 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केले आहे.
अशा पद्धतीने होतो भ्रष्टाचार
एखाद्या नागरिकाचा मागील 10 वर्षांचा कर थकलेला असेल तर सुरुवातीच्या दोन वर्षांच्या कराची पावती दिल्या जाते. त्यानंतर उर्वरित आठ वर्षांपैकी मागील वर्ष आणि चालू वर्ष अशा एकूण दोन वर्षांची पुन्हा पावती दिल्या जाते .या दोन्ही पावत्यांमधील उर्वरित सहा वर्षांपैकी तीन वर्षाची कराची रक्कम वसुली अधिकारी घेतो आणि तीन वर्षाच्या कराची रक्कम नागरिकाला सूट दिली जाते. त्यामुळे नागरिक देखील आपल्याला चालू वर्षापर्यंत पावती मिळाल्यामुळे तो देखील खुश होतो. कर वसुली अधिकाऱ्याला पैसे मिळाले त्यामुळे तो देखील खुश होतो. अनेक वेळा नागरिक कर भरण्यासाठी तयार असताना देखील कर वसुली अधिकारी विरोध करताना दिसतात त्याचे मूळ कारण हेच आहे. यामध्ये नुकसान मात्र महानगरपालिकेचे होते.—////
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172