Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

बाई सात वेळा यावं लागेल ! महिलेवर फड्याने उपचार करणाऱ्या बाबा वर गुन्हा दाखल

भोकरदन- भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजुर येथून जवळच असलेल्या चांदई एक्को या गावातील एका भोंदू बाबावर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून  हसनाबाद पोलीस ठाण्यात ,महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या परिसरातील काही ग्रामस्थांना शेतातील एका झोपडीत होणाऱ्या या उपचारा संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, केळी आणि भजे प्रसाद देऊन अंगावरून फाडा झटकल्यानंतर आणि सातवेळा वारी केल्या नंतर त्यांना त्यांच्या आजारापासून मुक्ती मिळाली आहे. आणि कुठल्याही प्रकारची फी घेणे किंवा अघोरी कृत्य इथे केल्या जात नव्हते.

पुणे येथील शनिवार पेठ भागात राहणाऱ्या वर्षा संभाजी शेंडे ,वय 45 या घटस्फोटीत विवाहित आहेत. परिवारातील समस्या संदर्भात ऑनलाइन माहिती घेत असताना त्यांना चांदई एको येथील या प्रकरणातील आरोपी सोमीनाथ महाराज ढाकणे उर्फ गुणवंत बाबा यांच्या विषयी माहिती मिळाली. समस्या निवारण करण्याकरिता त्या दिनांक 15 एप्रिल रोजी दुपारी चांदई एकको येथे गेल्या. तिथे शंभर रुपये फी भरल्यानंतर या बाबाच्या कुटीमध्ये गेल्यानंतर तिथे अगोदरच कांही लोक बसलेले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास वर्षा शेंडे यांना बोलावण्यात आले. यावेळी कुटीमध्ये गुणवंत बाबा आणि अन्य दोघेजण बसलेले होते. त्यावेळी बाबांनी श्रीमती शेंडे यांना पारिवारिक समस्यांविषयी विचारले आणि शेंडे यांनी समस्या सांगितल्यानंतर बाबांनी तुम्हाला बाहेरची हवा लागली आहे. सात वेळा यावे लागेल, असे म्हणत श्रीमती शेंडे यांच्या शरीराला सर्व बाजूंनी झाडूने स्पर्श केला. हा स्पर्श शेंडे यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी बाबा हे असं काय करता? असा असा प्रश्न विचारताच बाबांनी  राखेचे पाणी महिलेच्या अंगावर  शिंपडले. महिलेने या प्रकाराला विरोध केला आणि पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी दिली. त्यानंतर या महिलेला एक केळी आणि एक भजा देऊन  बाहेर काढण्यात आले. बाहेर आल्यानंतर या महिलेने हे केळी आणि भजे फेकून दिले त्यावेळी महिलेला तुझा अपघात होईल, तुला रक्ताच्या उलट्या होतील, जादूटोणा करून तुला मारून टाकेल अशा धमक्या भोंदू बाबांनी दिल्या. बाहेर आल्यावर महिलेला थकवा जाणवल्यानंतर बराच वेळ तिथेच बसून राहिले आणि त्यानंतर तिने हसनाबाद पोलीस चौकी गाठून आपली तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी दिनांक 15 पासून दिनांक 25 एप्रिल पर्यंत या प्रकरणाची चौकशी केली आणि 25 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. आली यावेळी फिर्यादीच्या बहीण एडवोकेट स्वाती बार भाई अनुराधा हेरकर माया गायकवाड विमल आगलावे मधुकर गायकवाड ज्ञानेश्वर गिराम शंकर बोर्डे संजय हेरकर यांची उपस्थिती होती.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button