चिमुकलीला पळून नेणाऱ्या बीड जिल्ह्यातील तिघांना नारायणगाव येथून घेतले ताब्यात
जालना- तीन वर्षांपूर्वी आईचे निधन झालेल्या आणि व्यसनाधीन वडील असलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या कु. नेहा हिचा सांभाळ तिची वृद्ध आजी सुशिलाबाई शिंदे (रा. बानेगाव, ता. घनसावंगी) जालना येथील बसस्थानकावर भिक्षा मागून करीत होत्या.
दिनांक 25 च्या मध्यरात्री नेहा ही जालना बसस्थानकात वृद्ध आजीच्या कुशीत झोपलेली असतांना अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्यांनी डाव साधला आणि आजीच्या कुशीतून नेहाला पळवून नेले. नेहाला पळवल्याची बाब लक्षात येताच आजींनी तातडीने आरडाओरडा केला, मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.आजींच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि. 363 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.अत्यंत गरीब, भिक्षा मागणाऱ्या वृद्ध आजीच्या नातीचा शोध लागेल की नाही..? पोलीस तपास करतील की नाही..? अशी शंका उपस्थित होत होती मात्र, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जनतेच्या शंका दूर करण्यासाठी तातडीने पाऊले उचलून ह्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्याकडे वर्ग केला व त्याचा तपास पथकाकडून रोज पाठपुरावा घेतला.ज्यावेळी मुलीचे अपहरण झाले तेंव्हा बस स्थानक परिसरात वीज गेल्यामुळे अंधाराचे साम्राज्य होते, त्यामुळे सीसीटीव्ही बंद होते. त्यामुळे या तपासाचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. दरम्यान, त्याच रात्री पोलिसांना जालना रेल्वे स्थानकावर एका सीसीटीव्हीमध्ये तीन संशयित एका मुलीला घेऊन रेल्वेत बसताना दिसले आणि त्यानंतर तपासाला गती मिळाली.
सात दिवसांत पूर्णा, नांदेड रेल्वे स्थानकासह शहागड येथेही ही तीन संशयित सीसीटीव्हीमध्ये दिसले होते._
पोलीस निरीक्षक खनाळ यांच्या पथकाने तब्बल सात दिवस विविध ठिकाणे पिंजून काढून, तपासचक्रे फिरविली होती.
दरम्यान, काल रात्री उशिरा तमाशा कलावंताची पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे या चिमुकलीला विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक खनाळ यांच्या पथकाने झडप घातली आणि चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे._
चिमुकलीला चोरून पळवून नेणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अपहरणकर्ते एकाच कुटुंबातील असून, पती, पत्नी आणि मुलगा आहेत. ते बीड जिल्ह्यातील घोडका राजुरी गावातील रहिवासी आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172