आचार्य श्री महाश्रवणजी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम
जालना -तेरापंथ समाजाचे आचार्य श्री महाश्रवणजी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 16 ते 22 मे दरम्यान जैन समाजाचे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये 63 वा जन्मोत्सव, पंधरावा पटोत्सव आणि 50 वा दीक्षा कल्याण पर्व या कार्यक्रमांचा समावेश आहे.
कोण आहेत हे युग प्रधान आचार्य श्री महाश्रवणजी?या आचार्यांचा जन्म 13 मे 1962 ला झाला. 5 मे 1974 ला दीक्षा घेतली आणि 23 मे 2010 ला आचार्य पदावर विराजमान झाले .आत्तापर्यंत त्यांनी भूतान, नेपाळ अशा सुमारे 23 राज्यांमधून 60 हजार किलोमीटर पेक्षा जास्त पायी प्रवास केला आहे .हिंदू ,मुस्लिम, शीख ईसाई ,बौद्ध, आदि धार्मिक लोकांनी देखील आचार्यांच्या उपदेशांचा स्वीकार केला आहे. हिंदी, इंग्रजी, संस्कृत, प्राकृत, राजस्थानी आदि भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत सुमारे एक करोड लोकांनी आचार्यांपासून प्रेरणा घेऊन व्यसनमुक्ती करून घेतल्याचा दावा आयोजकांनी केला आहे .अशा या आचार्यांच्या सानिध्यात श्री गुरु गणेश तपोधाम परिसरामध्ये हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. याविषयीची सविस्तर माहिती समणी सौम्य प्रभा यांनी आज पत्रकारांना दिली .यावेळी समणी ख्याती प्रज्ञा यांच्यासह सचिन पिपाडा, सुनील सेठिया, अनिल संचेती, पवन सेठिया ,विधीज्ञ अभय सेठिया आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला सर्व समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन तेरा पंथ युवक परिषद, श्री जैन श्वेतांबर तेरापंथ सभा, तेरा पंथ महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172