फक्त लाच नको दारूही द्या ! निलंबित कर्मचाऱ्याने केली तक्रार; न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांसह दोघेजण जाळ्यात
परतूर– फक्त लाचच न मागता लाचेसोबत एका विदेशी कंपनीची दारू मागितली आणि ती देखील निलंबित झालेल्या आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याला .परंतु या कर्मचाऱ्यांची लाच देण्याची इच्छा नव्हती. .त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवली आणि या तक्रारीच्या अनुषंगाने रचलेल्या सापळ्यामध्ये पालिकेचे मुख्याधिकारी आणि एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी अडकले आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार हा पूर्वी परतुर नगरपालिकेमध्येच कर्मचारी होता. त्याची बदली बल्लाळपूर येथे झाले आहे. तिथे हजर झाल्यानंतर 2023 मधील निलंबन कालावधी मधील पगार बिल काढून देण्यासाठी आणि परतूर नगरपालिकेतून बल्लाळपूर येथे सेवा पुस्तक पाठविण्यासाठी या नगरपालिकेचे प्रभारी स्थानक पर्यवेक्षक तथा फायरमन अनिल वल्लभदास पारिख, वय 48 वर्ष (वर्ग चार) याने 75 हजार रुपये तसेच सिग्नेचर कंपनीची विदेशी दारू लाच म्हणून मागितली. दिनांक आठ आणि नऊ असे दोन दिवस या व्यवहारांमध्ये तडजोड सुरू होती. शेवटी नऊ तारखेला चाळीस हजार आणि विदेशी दारूची बाटली यावर हा व्यवहार पक्का झाला. परंतु तक्रारदाराचे पगार पत्रक बल्लाळपूर येथे पाठविण्यासाठी या पालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक अशोक परदेशी, वय 38 वर्ष (वर्ग दोन )यांनी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी अनिल पारीख यांनी केली .अशी एकूण 55 हजार रुपये रोख आणि सिग्नेचर कंपनीची विदेशी दारूची बाटली लाच म्हणून स्वीकारताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिनांक 10 रोजी अनिल पारिक याला रंगेहात पकडले आहे. लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्यावर ठेवण्यात आला असून दोघांवरही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172