छ. संभाजीनगर मध्ये बोगस मतदान करण्याच्या तयारीत असलेल्या सहा आरोपींना पोलिसांनी पकडले
छ. संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर येथे आज दिनांक 13 रोजी लोकसभेसाठी मतदान सुरू होते यावेळी दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही आरोपींना बोगस मतदान करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी पकडले आहे. पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी प्रेमसिंग उत्तमसिंग चव्हाण यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .हे आरोपी 12 वाजेच्या सुमारास बुढीलाईन, सागर एक्वा जवळ, तवक्कल पान सेंटरच्या समोर ,एम. एस .सी .बी. कार्यालय, जुबली पार्क, भडकल गेट ते मिल कॉर्नर यादरम्यान पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची बॉटल आणि अत्तराची छोटी रिकामी काचेची बॉटल ज्यामध्ये पाण्यासारखे द्रव होते हे द्रव बोगस मतदान करण्याच्या उद्देशाने बोटावर लावलेली पहिली शाई पुसून टाकण्याचे काम करते.(rin fabric whitener) ही शाई या आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे.हे आहेत ते आरोपी.1)शेख मोबीन शेख जलील अहेमद वय.35 वर्षे,रा. शहा काँलनी, उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर,
2) सय्यद साजीद सय्यद साबेर वय.27वर्षे,रा.सागर हाँटेलच्या मागे,बुढ्डीलाईन, छत्रपती संभाजीनगर,
3) अनिस खान मसुद खान वय.41 वर्षे, रा.जजीरा हाँटेल समोर बुढ्ढीलाईन छत्रपती संभाजीनगर,
4) सय्यद सलाउद्दीन शकुर सालार वय.39वर्षे रा.बुढ्डीलाईन छत्रपती संभाजीनगर,
5) तारेख बाबू खान वय.23 वर्षे, धंदा. खाजगी नौकरी,रा.घर नं.5-1-30,बारापुल्ला किंग बेकरीजवळ, मिलकाँर्नर छत्रपती संभाजीनगर ,
6) मुद्दसीर इमरान खान वय.19 वर्षे, धंदा. खाजगी नौकरी रा. कोतवालपुरा छत्रपती संभाजीनगर .
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172