बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व; गुरुवारी रॅलीचे आयोजन
जालना- भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात वैशाखी पौर्णिमेला तीन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या होत्या त्यामुळे या वैशाखी पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असे देखील संबोधतात. या बौद्ध पौर्णिमेनिमित्त गुरुवार दिनांक.23 मे रोजी सकाळी 7.30 वाजता पायी रॅली व महा बुध्दवंदना आयोजित करण्यात आली आहे.
नुतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सकाळी ७.३० वाजता अभिवादन करुन पायी रॅलीस सुरुवात होणार आहे. ही रॅली नुतन वसाहत, शनिमंदीर, चमन मार्गे मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप होणार आहे. या ठिकाणी सकाळी 9 वाजता महा बुध्दवंदना व धम्मदेसना होणार आहे. रॅलीत नागेवाडी येथील भन्ते धम्मधर शाक्यपुत्र थेरो, भन्ते शिवली शाक्यपुत्र, रामनगर येथील भन्ते रेवत तसेच नागेवाडी येथील श्रामणेर संघ सहभागी होणार आहे.यावेळी बुध्द जयंती साजरी करण्यासाठी बौध्द बांधवांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन रॅलीत सहभागी व्हावे. असे आवाहन भारतीय बौध्द महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.
भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील या आहेत तीन महत्त्वाच्या गोष्टी.सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, वयाच्या 29 व्या वर्षी राज सिंहासन, पत्नी, मुलांना सोडून याच दिवशी त्यांनी आत्मज्ञान आणि मोक्षप्राप्तीसाठी पहिले पाऊल टाकले, वयाच्या 80 व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला त्यांनी समाधीच्या माध्यमातून महानिर्वाण प्राप्त केले.——–
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172