1.
Jalna Districtजालना जिल्हा

जिल्ह्यात 47 गावांना पुराच्या आपत्तीचा धोका ,प्रशासन सज्ज, घनसावंगी तालुक्यावर भर

जालना -सन 2006 आणि सन 2008 मध्ये आलेल्या पूर आपत्तीला जिल्हा प्रशासनाने तोंड दिले होते आणि तीच परिस्थिती यावर्षी जर उदभवली तर या आपत्तीला तोड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

आपत्ती व्यवस्थापनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्याची आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी नुकतीच घेतली आहे .सन 2006 आणि 2008 मध्ये जालना जिल्ह्यामध्ये एकूण 47 गावांना आपत्तीचा सामना करावा लागला. त्यामध्ये जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे अंबड तालुक्यातील 16, घनसावंगी 18, परतुर पाच अशा गोदाकाठच्या एकूण 39 गावांचा समावेश होता. तर इतर नद्यांमुळे मंठा तालुक्यातील3, भोकरदन तीन आणि जाफराबाद दोन अशा आठ गावांचा समावेश होता. यावर्षी देखील या गावांसाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे .जालना तालुक्याला कुंडलिका, अंबड – घनसावंगी साठी गोदावरी ,भोकरदन साठी धामणा ,रायघोळ ,केळणा आणि जाफराबाद  केळणा नदी तर मंठ्यासाठी पूर्णा नदीमुळे आपत्ती व्यवस्थापनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे .त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे .त्यासाठी लागणारे रबर बोट, हेल्मेट, पोर्टेबल स्ट्रक्चर, काँक्रीट कटर ,सेफ्टी जॅकेट, इमर्जन्सी लाईट आदी साहित्याचा समावेश आहे. त्यासोबत यावर्षी घनसावंगी तालुक्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार शासनाकडून आलेल्या साहित्यांपैकी घनसांवगीच्या तहसील कार्यालयाकडे एक इन्फ्लाटेबल रबर बोट  एक,20 रिंग, 30 लाइफ जॅकेट तसेच पाच सेफ्टी किट आणि पाच इमर्जन्सी लाईट देण्यात आले आहेत .कारण घनसावंगी तालुक्यात गोदावरी नदीकाठी 18 गावांचा समावेश आहे आणि या ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवण्याची शक्यताही आहे. यासोबत प्रशासनाने पाटबंधारे विभागाची देखील नोंद घेतली आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यामध्ये लघुपाटबंधारे- जलसंधारण या विभागांतर्गत एक मोठा प्रकल्प आहे ,सात मध्यम प्रकल्प आहेत, 57 लघु प्रकल्प आहेत, 15 साठवण तलाव ,1890 पाझर तलाव ,अकरा सिंचन तलाव 219 कोल्हापुरी पाटबंधारे तलाव, अशा एकूण 998 गावांमध्ये 3196 तलाव आहेत. या सर्व आपत्ती व्यवस्थापनाला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे आपत्तीमध्ये संबंधित तहसीलदारांना त्यांचे भ्रमणध्वनी 24 तास चालू ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button