आयडियाची भन्नाट कल्पना;12 वीची परिक्षा दिलेल्या 34 हजार विद्यार्थ्यांचे नाव मतदार यादीत नोंदणीसाठी विशेष अभियान
जालना- यावर्षी इयत्ता 12 वीची परिक्षा दिलेल्या 34 हजार विद्यार्थांचे नाव मतदार यादीत नोंदणीसाठी ‘मी बारावी पास… मतदार नोंदणी हमखास….! विशेष उपक्रम राबविला जाणार असून याबाबत जिल्हातील 234 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली आहे. या प्रकारामुळे विविध कारणांमुळे नव मतदारांची नाव नोंदणी टाळणाऱ्यांची संख्या कमी होईल, नव मतदारांमध्ये उत्साह वाढेल आणि मतदानाची टक्केवारी ही वाढेल अशी ही आयडियाची भन्नाट कल्पना आहे.
यावर्षी नुकताच बारावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हातील 234 महाविद्यालयातील 34059 विद्यार्थांनी बारावीची परिक्षा दिलेली आहे. निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ही मुले देशाच्या कानाकोपऱ्यात जातात.बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचे वय हे 18 वर्षे पूर्ण झालेले असते व हे विद्यार्थी मतदार यादीत नावनोंदणीसाठी पात्र असतात. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या सर्व विद्यार्थ्यांची टी. सी. व गुणपत्रिका हस्तगत करतांना संबंधित महाविद्यालयात त्यांचा मतदार यादीत नाव नोंदणीसाठीचा नमुना अर्ज क्रमांक 6 भरुन घेण्यात यावा व या अर्जासोबत आधार कार्ड,विद्यार्थांचे गुणपत्रक व टी.सी.सोबत जोडून द्यावी. याबाबत जिल्हातील 234 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सर्व प्राचार्यांनी उपस्थित राहणेबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आले आहे.तालुका निहाय महाविद्यालय व विद्यार्थी संख्या खालील प्रमाणे आहे.तालुक्याचे नाव व विद्यार्थी संख्या –जालना 6692,बदनापुर 3676,अंबड 3328,घनसावंगी 1489,परतुर 2660,मंठा 1973,भोकरदन 11064,जाफ्राबाद 3177,एकूण 34059 विद्यार्थी आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172