पोलखोल! होर्डिंगची जबाबदारी कोणाची?कोणाचे किती होर्डिंग्स ?दर किती ? कशी करतात धूळफेक ?वाचा सविस्तर बातमी

जालना -जालना शहरातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये सर्वत्र अनाधिकृत होर्डिंगचा बोलबाला सुरू आहे. विशेष करून शहरांमध्ये अशा होर्डिंग जास्त प्रमाणात आढळून येतात. याच्यावर कोणाचे नियंत्रण आहे? याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जबाबदारी नक्की करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अशा होर्डिंग ची तपासणी पाहणी करणे याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर आहे, महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हीच जबाबदारी मनपायुक्तांवर आहे तर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, अप्पर जिल्हाधिकारी मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीमध्ये असलेल्या होर्डिंग्सला परवानगी देणे,कर भरून घेणे आणि ज्या होर्डिंगना परवानगी दिलेली आहे त्यांची गुणवत्ता तपासणे याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात जर काही दुर्घटना घडली तर त्याला हे अधिकारी जबाबदार असणार आहेत.
जालना शहरात 280 होर्डिंग अधिकृत असल्याची माहिती मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे. प्रत्यक्षात शहरातील अंबड चौफुली, मंठा चौफुली, भोकरदन नाका ,आझाद मैदान, आणि गांधीचमन या पाच ठिकाणांची जर तपासणी केली तर 280 पेक्षाही जास्त होर्डिंग येथे निघतील. मग शहरातील इतर भागात असलेल्या होर्डिंग कोणाच्या? या प्रश्नाचे उत्तर ना कधी कोणाला मिळाले ना मिळेल. त्यामध्येही परवाना एका आकाराचा आणि प्रत्यक्षात दुसराच आकार या होर्डिंगचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यापेक्षाही आणखी कहर म्हणजे अनेक ठिकाणी एका होर्डिंगचा परवाना घेतल्यानंतर त्यालाच दोन्ही बाजूने म्हणजे चीतपट होर्डिंग करून जाहिरात दाराकडून डबल पैसा उकळला जातो आणि कर मात्र एका होर्डिंग चा आणि तो देखील लहान आकाराचा भरला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरख धंदा सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी पुणे आणि मुंबई येथे होर्डिंग ची दुर्घटना घडल्यानंतर जालना जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे आणि या होर्डिंग संदर्भात उपाययोजना सुरू केली आहे. खाजगी इमारतींवर देखील मर्यादेपेक्षा जास्त आकाराचा फलक असेल तर त्याचा देखील परवाना घेऊन महानगरपालिकेकडे कर भरावा लागतो सध्या जालना शहराच्या भोवती असलेल्या मोठमोठे इमारतींवर अशा खाजगी नावाचे फलक मोठ्या प्रमाणात आहेत त्याची देखील परवानगी आहे का आणि त्याची स्थिती काय आहे हे तपासल्या जाईल असेही आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितले.
कोणाच्या आणि किती होर्डिंग्स? किती भरतात कर? खाजगी किती सरकारी किती?जालना शहर महानगरपालिका जर जाहिरात एजन्सी महानगरपालिकेच्या जागेवर होर्डिंग लावत असेल तर एजन्सी कडून 42 रुपये 35 पैसे आणि खाजगी जागेवर लावत असेल तर 37 रुपये 40 पैसे एका चौरस फुटासाठी भाडे आकारते हे भाडे एका वर्षासाठी असते.* हे आहेत जालना महानगरपालिकेचे अधिकृत एजन्सी धारक. इम्पॅक्ट ऍडव्हर्टायझिंग हेमंत ठक्कर यांच्याकडे एकूण 125 जाहिरात होर्डिंग आहेत .त्यापैकी 18 खाजगी आहेत तर 107 सरकारी जागेवर आहेत. वर्षाकाठी सहा लाख 27 हजार 24 रुपये ते कर भरतात .*आस्था डिजिटल चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडे एकूण 29 होर्डिंग आहेत आणि सर्व मनपाच्या जागेवर आहेत. वर्षाकाठी ते तीन लाख पंधरा हजार 930 रुपये मनपाला कर भरतात.* जोगदंडे ऍडव्हर्टायझिंग जालना यांच्याकडे देखील सर्व शासकीय जागेवर होर्डिंग आहेत 37 होर्डिंग साठी ते दरवर्षी दोन लाख 36 हजार 311 रुपये कर मनपाला भरतात .*श्री फ्युचर मीडिया ऍडव्हर्टायझिंग छत्रपती संभाजी नगर, यांचे जालना शहरात खाजगी जागेवर सात होर्डिंग आहेत आणि वर्षाकाठी एक लाख 81390रुपये कर ते मनपाकडे भरतात. उपेंद्र ऍडव्हर्टायझिंग छत्रपती संभाजी नगर यांचे खाजगी जागेवर दोन होर्डिंग आहेत आणि 46 हजार 750 रुपये कर भरतात .श्री भक्ती ऍडव्हर्टायझिंग मंमादेवी चौक जालना यांचे एकूण 14 होर्डिंग आहेत ,त्यापैकी चार खाजगी जागेवर आणि 14 मनपाच्या जागेवर आहेत .85 हजार 250 रुपये वर्षाला मनपाकडे कर भरला जातो. वेदांत ऍडव्हर्टायझिंग जालना 15 होर्डिंग पैकी चार होर्डिंग खाजगी जागेत तर 11 होर्डिंग या मनपाच्या हद्दीत आहेत. एक लाख 52 हजार 449 रुपये वर्षाकाठी त्यांना कर भरावा लागतो .शुभम प्रिंटर्स मंमादेवी चौक जालना मनपाच्या हद्दीत 16 होर्डिंग आहेत आणि एक लाख 43 हजार 989 रुपये कर त्यांना भरावा लागतो .सह्याद्री सर्विसेस जालना सरकारी जागेवर दोन होर्डिंग असून 16 हजार 940 रुपये कर त्यांना भरावा लागतो तर दुर्गेश डिजिटल जालना यांचे एकूण पस्तीस होर्डिंग आहेत त्यापैकी पाच खाजगी जागेवर आणि 30 सरकारी जागेवर आहेत वर्षाकाठी 3 लाख 65,596 कर महापालिकेकडे भरावा लागतो.
अशाप्रकारे अधिकृत होर्डिंगचा कर महानगरपालिका आकारते परंतु अनधिकृत होर्डिंग किती?कोणाचे? आणि त्याचा” कर” कोण घेतो? आणि किती ठरवतो हे न सुटणारे गणित आहे. परंतु देर आहे दुरुस्त आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही काही का होईना महानगरपालिकेकडे आता अशा होर्डिंग ची नोंद व्हायला लागली आहे.—–
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172