नागपूर मध्ये अपयश आल्यानंतर जालन्यात आले यश; एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी पोलिसांच्या जाळ्यात
जालना- जालना शहरात एका पाठोपाठ दोन एटीएम फोडण्यात आले आणि दोन्ही एटीएम फोडण्याची पद्धत सारखीच आहे. गॅस कटरच्या साह्याने एटीएम चा समोरचा भाग कापून आत मधील रोख रक्कम लंपास करायची. हा सर्व कार्यक्रम 15 ते 20 मिनिटांमध्ये आटोपल्या जायचा .
जालना शहरात दिनांक 19 मे रोजी महावीर चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून 24 लाख रुपयांची रक्कम चोरीला गेली होती. या चोरीचा तपास सुरू असतानाच 26 तारखेला पुन्हा औद्योगिक वसाहती मधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून रक्कम लंपास केली आहे. या सर्व प्रकाराचा तपास जालना पोलीस म्हणजे स्थानिक गुना शाखेचे पोलीस करत होते. दरम्यान हा तपास करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुना शाखेच्या वेगवेगळ्या टीम काम करत होत्या .त्यापैकीच एका टीमला हे आरोपी पकडण्यात यश आले आहे. चार जणांची ही टोळी असून त्यापैकी साजिद राजुद्दीन खान, वय पंचवीस वर्ष राहणार भकरोजी ,फिरोजपुर झिरका, जिल्हा लोह (हरियाणा) इथे जाऊन ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे.
यापूर्वी देखील त्यांनी नीमच( मध्य प्रदेश) नाशिक, नागपूर (महाराष्ट्र )येथेही एटीएम मशीन कट करून चोरी केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान या आरोपीने आणखी तीन आरोपींच्या साहाय्याने हे काम केले असल्याची कबुली दिली. मात्र रोख रक्कम हस्तगत झालेली नाही. सदरील रक्कम ही उर्वरित तीन आरोपीकडे असल्याचे त्याने सांगितले आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, यांच्या टीम मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे ,सुधीर वाघमारे ,सचिन चौधरी ,धीरज भोसले, योगेश सहाने, या टीमने ही कामगिरी केली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172