वारे पठ्ठ्या! याला म्हणतात वाळूमाफिया; तहसीलदारांच्या डोळ्यासमोर गायब केला वाळूने भरलेला हायवा?कसा?
जालना- तुम्ही असे एखादं चित्र उभं करा की, रस्ता आढळणीचा आहे,रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत, जिथे दुचाकी देखील वीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाऊ शकत नाही, चार चाकी कार सारखे वाहन या रस्त्याने गेले तर चेंबर फुटण्याची भीती खरी ठरू शकते !अशा रस्त्याने रात्रीच्या वेळी वाळूने भरलेला हायवा पोलिसांच्या वाहनापेक्षा जास्त गतीने पळून गायब होऊ शकतो का? हो होऊ शकतो? हा चमत्कार झाला आहे जालना तालुक्यात चंदंनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार दिनांक 27 च्या रात्री दहा वाजेच्या सुमारास.
मागील आठवड्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्या यांच्या पथकाने जालना जिल्ह्यातील जाफराबाद, घनसावंगी आणि बदनापूर येथे वाळू माफियांवर मोठ्या कारवाया केल्या आणि सुमारे 60 कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यामुळेच की काय जालना तहसीलदार श्रीमती छाया पवार यांनी देखील सोमवार दिनांक 27 रात्री वाळू 9 वाजता वाळू माफियांवर कारवाई करण्याचे ठरवले आणि जालना सज्जाचे तलाठी अंकुश आंबटकर यांना घेऊन रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास राजूर रस्त्यावर तळ ठोकून बसले. याचवेळी वखार महामंडळासमोरून वाळूने भरलेला एक हायवा ज्याच्यावर क्रमांकच नव्हता असा येत असताना तहसीलदारांनी पकडला. हायवा चालकाला नाव गाव विचारले असता त्याने राजू कोलते ,राहणार पिरपिंपळगाव, तालुका बदनापूर सांगितले आणि ही वाळू आणि वाहन आपले नाही माझ्याकडे कोणताही वाळू वाहतुकीचा परवाना नाही असे सांगून हा हयवा ऋषी काकडे यांचा आहे असे सांगितले. दरम्यान तहसीलदारांनी हा हायवा चंदन जिरा पोलीस ठाण्याकडे घेण्यास सांगितला , परंतु चालकाने तो तिकडे घेण्यास नकार देऊन ऋषी काकडे यांना सांगावे लागेल असे सांगून तेथेच थांबला. थोड्याच वेळात. एका होंडा शाईन क्रमांक एम एच 21 बी बी 59 24 वरून दोघेजण तेथे आले गणेश काकडे आणि रोहित शिंदे हे दोघे तेथे आले दरम्यानच्या काळात तहसीलदार श्रीमती छाया पवार यांनी नायब तहसीलदार दिलीप सोनवणे आणि तलाठी विठ्ठल कणके यांना फोन करून बोलावून घेतले होते. या वेळी गणेश काकडे यांनी राजकीय पुढार्यांना फोन लावले तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी अरुण डुकरे यांच्याशी संपर्क करून जागेवरच चलान फाडता येईल का? अशीही विचारणा केली. परंतु तशी काही तरतूद नसल्यामुळे हा हायवा पोलीस ठाण्याला घेऊन जा तिथे काय ते पाहू असे म्हणत तहसीलदार श्रीमती छाया पवार यांनी तलाठी अंकुश आंबटकर यांना चालकासोबत बसून हायवा चंदंनजिरा पोलिसाकडे वळवला .दरम्यान हॉटेल कनक जवळ वाहन चालकाने हा हायवा थांबवला. यावेळी हायवाच्या बाजूने शुभम मारेकर, गणेश काकडे, रोहित शिंदे, आर्दड व इतर पाच सहा जण जमा झाले होते. त्यामुळे तलाठी आंबटकर खाली उतरले त्यावेळी त्यांच्यासोबत वाद झाला आणि हायवा चालकाने वाळूने भरलेला हायवा निधोना आणि जिंदल शाळेच्या समोरून लंपास केला. केला त्या पाठोपाठ जादूचाकीवरून इतर काही जण आले होते ते देखील पसार झाले. हा तोच रस्ता आहे ज्या रस्त्यावर दुचाकी प्रतितास वीस किलोमीटरच्या पेक्षा जास्त पळवता येत नाही चार चाकी वाहनाला रस्ता फोडून वर आलेला दगड कधी गाडी फोडेल याचा भरोसा नाही, रस्त्यावर लाईट नाहीत वळणाचा रस्ता आहे अशा रस्त्यावर वाळूने भरलेल्या हायवाची गती किती पोलिसांच्या वाहनापेक्षा जास्त असेल का ज्यामुळे पोलिसांना हा हायवा सापडला नाही? या संदर्भातील माहिती चंदनजीरा पोलिसांना दिली आणि ज्या रस्त्याने हायवा गेला आहे तो रस्ताही दाखवला मात्र पोलिसांच्या हाती ना हायवा लागला ना दुचाकी ना वरील व्यक्ती. दरम्यान हा सर्व प्रकार उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ यांना सांगितल्यानंतर ते देखील घटनास्थळावर आले आणि झालेल्या घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी तलाठी अंकुश आंबटकर यांनी चंदंनजिरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गणेश काकडे, रोहित शिंदे, शुभम मारेकर,अरडद, रा. राजा टाकळी हल्ली मुक्काम चंदन झिरा जालना .यांच्यासह इतर पाच-सहा जणांविरुद्ध दुर्गेश गणेश गिरी वय 33 साला सजा जालना यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदंनजिरा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 353,379, 504, अन्वये आज दिनांक 28 रोजी सकाळी साडेचार वाजता गुन्हा दाखल केला आहे. आणि जो हवा तहसीलदारांच्या डोळ्यासमोर त्यांचे कर्मचारी असताना आणि चंदनजीरा पोलिसांच्या नाकावर टीचून क्रमांक नसलेला हायवा गायब झाला आहे. आता पटले ना की, हायवा गायब होऊ शकतो का? तर होऊ शकतो. फक्त एक दुसऱ्याला सहकार्य अपेक्षित आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172