Jalna Districtजालना जिल्हा

दानवेंची मस्ती आम्ही जिरवू!-विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार

जालना- भोकरदन तालुक्यातील जवखेडा येथे आठ दिवसांपूर्वी  कुंभार समाजाच्या गजानन संत्रे यांच्या घरावर  जेसीबी चालवण्यात आले,  त्याचे पूर्ण घर उध्वस्त करण्यात आले. दरम्यान हे घर केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी उध्वस्त केल्याचा आरोप या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच यापूर्वी देखील त्यांनी मारहाण केली होती आणि मुख्य रस्त्यावर असलेली जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप या कुटुंबीयांनी केला होता.  या संदर्भात प्रसारमाध्यमांवर बातम्याही प्रकाशित झाल्या होत्या. याची दखल घेऊन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज जवखेडा येथे जाऊन या कुंभार कुटुंबाची भेट घेतली आणि उध्वस्त केलेल्या घराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान कुटुंबीयांचा आक्रोश आणि विजय वडेट्टीवार यांनी दिलेली प्रतिक्रिया जशीच्या तशी आपणापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, लोकसभेचे उमेदवार डॉ. कल्याण काळे माजी आमदार चंद्रकांत दानवे आदींची उपस्थिती होती.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button