वाद नालीचा निकाल रस्त्याचा! जालना तहसीलच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली भांडणे; प्रकरणाची सखोल चौकशी गुलदस्तात?
जालना- “आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला” असा काही प्रकार जालना तहसीलच्या निर्णयामुळे झाला आहे. वाद नालीचा आणि निकाल रस्त्याचा, या अजब निर्णयामुळे बांधाला बांध असणारे शेतकरी बांधवांमध्ये वितुष्ट निर्माण होत आहे. ज्या रस्त्याची मागणीच नाही, अर्जही नाही, अशा मागणीला सहा महिन्यानंतर पुरवणी तक्रार दाखवून निकाल दिल्या गेला. या निकालामुळे एक दुसऱ्यांचे शेजारी असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भांडणे सुरू झाले आहेत. या निकाल देणाऱ्या नायब तहसीलदाराची सखोल चौकशी करावी असे आदेश तत्कालीन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कांबळे यांनी दिनांक एक फेब्रुवारी 2024 रोजी जालनाच्या तहसीलदारांना दिले आहेत ही. चौकशी गुलदस्त्यातच आहे परंतु शेतकऱ्यांमध्ये लागलेले ही भांडणे आता विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जालना तालुक्यातील रेवगाव येथे दिलीप बापूराव गोल्डये आणि अशोक जनार्दन कदम या दोघांची गट नंबर 142 व 121 मध्ये जमीन आहे. दोघांचेही गट नंबर वेगवेगळे आहेत दरम्यान या दोघांच्या बांधामधून पारंपारिक शेतीचे पाणी वाहून जाण्यासाठी नाली आहे ही. आणि सुमारे 2022 एकरचे पाणी या नालीतून वाहून जाऊन मोठ्या नालीमध्ये मिळते.ही नाली बंद केल्याचा आरोप दिलीप गोल्डये यांनी अशोक कदम यांच्यावर करून जालना तहसील मध्ये तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांनी दिनांक एक 4 2024 ला जानेवारीला घटनास्थळाची पाहणी करून दिलीप गोल्डये यांनीच नाली मध्ये दगड टाकून नाली दाबली असल्याचा निर्णय दिला आहे. असे असताना ही नाली मोकळी करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे .तो विषय बाजूला ठेवून या प्रकरणातील तक्रारदार दिलीप गोल्डे यांनी सहा महिन्यानंतर पुरवणी तक्रार अर्ज दिला आहे आणि या अर्जानुसार दिलीप गोल्डये यांनी अशोक कदम आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता देण्याची मागणी केली आहे असे भासवून नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांनी दिलीप गोल्डये यांना अशोक कदम आणि इतरांनी रस्ता करून द्यावा असे आदेश दिले आहेत. खरे तर अशोक कदम आणि दिलीप गोल्डये यांचे गट देखील वेगवेगळे आहेत असे असताना दिलीप सोनवणे यांनी दिलेल्या या निर्णयामुळे या रस्त्यावरील शेतकरी आणि दिलीप गोल्डये यांच्यामध्ये वाद होत आहेत. प्रकरण नाली दाबल्याचे असताना निर्णय रस्ता देण्याचा दिला. नायब तहसीलदारांनी सहा महिने राखून ठेवलेला निर्णय दिलीप गोल्डये यांच्याकडून रस्त्याची पुरवणी तक्रार घेऊन दिल्याचा समज या प्रकरणातील तक्रारदार अशोक कदम यांचा झाला आणि त्यांनी त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांची तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कांबळे यांनी जालन्याच्या तहसीलदारांना दिनांक एक फेब्रुवारी 2024 रोजी पत्र देऊन नायब तहसीलदार यांनी दिलेल्या निकालाची आणि सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे आदेश दिले आहेत. परंतु या आदेशाचा अद्याप पर्यंत काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे जे शेतकरी बांधव वर्षानुवर्ष गुण्या गोविंदाने राहत आहेत अशा बांधवांमध्ये नायब तहसीलदारांनी दिलेल्या या निर्णयामुळे भांडणे सुरू झाली आहेत. ज्यांनी ही भांडणे लावली आहेत त्यांनी जर त्वरित भांडणे मिटविली नाही तर भविष्यात ही भांडणे विकोपाला जातील शेतीचेही नुकसान होईल आणि या सर्व परिणामांना जबाबदार नायब तहसीलदार असतील असा इशारा देखील अशोक कदम यांनी दिला आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172