जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आता गावकऱ्यांचाच विरोध, जातीद्वेष, भीती, तीटकारा वाढत असल्याचा आरोप; निवेदन वाचा आणि बातमीही पहा
जालना- जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे दिनांक 29 ऑगस्ट 2023 पासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी विविध प्रकारचे आंदोलने केली आहेत. या आंदोलनामुळे गावामध्ये अनेक नेत्यांचा वावर वाढला होता, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते आणि या आंदोलनाला पाठिंबाही दिला होता. परंतु आता या आंदोलनाचा विषय भरकटत चालला आहे. त्यामुळे गावामध्ये जातीभेद, आपापसात द्वेष, भीतीचे वातावरण, एक दुसऱ्यांचा तिटकारा सुरू झाला आहे, एवढेच नव्हे तर मंदिराच्या बाजूलाच हे आंदोलन सुरू असल्यामुळे महिला वर्ग देखील या मंदिरात येण्यास धजावत नाही. त्यामुळे या आंदोलनाला आता पुढील परवानगी देऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांच्याकडे सुमारे दीडशे गावकऱ्यांनी केली आहे. काय म्हणणे आहे गावकऱ्यांचे सविस्तर वाचा आणि व्हिडिओमध्ये पहा.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172